मंगेश काळोखेंना भररस्त्यात संपवलं; खोपोलीतील हत्येचा सीसीटीव्ही व्हिडिओ आला समोर

Mangesh Kalokhe killing case update : मंगेश काळोखेंना भररस्त्यात दिवसाढवळ्या संपवल्याची घटना घडली. या हत्याकांडाचा व्हिडिओ समोर आलाय.
Mangesh Kalokhe case
Mangesh KalokheSaam tv
Published On
Summary

राज्य हादरवणाऱ्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणी मोठी अपडेट हाती

मंगेश काळोखे हत्या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर

पाच जणांनी मिळून केली काळोखेंची हत्या

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या मंगेश काळोखे हत्या प्रकरणाची मोठी अपडेट समोर आली आहे. शिंदे गटाच्या नगरसेविका मानसी यांचे पती मंगेश काळोखे यांच्या हत्याकांडाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. काळोखे यांची भर रस्त्यात पाच जणांनी मिळून धारदार शस्त्राने हत्या केली. या हत्या प्रकरणाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

मंगेश काळोखे हत्या प्रकरणात पोलिसांनी कारवाईचा धडाका लावला आहे. पोलिसांनी प्रत्यक्ष हत्या करणारे आणि कट रचणारे अशा एकूण १० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत अजित पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष सुधाकर परशुराम घारे यांच्या सह एकूण दहा जणांवर गुन्हा दाखल केलाय. तर पोलिसांनी आतापर्यंत ७ आरोपींना अटक केली आहे. याच हत्याकांडाचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्याने पोलिसांच्या कारवाईला आणखी गती मिळण्याची शक्यता आहे.

Mangesh Kalokhe case
मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, रविवारी प्रवाशांचा खोळंबा होणार; कसं आहे रेल्वेचे वेळापत्रक?

सीसीटीव्ही व्हिडओमध्ये काय दिसत आहे?

मंगेश काळोखे रस्त्यावर पळताना दिसत आहेत. दहशतीत असलेले मंगेश काळोखे सैरावैरा पळताना दिसताहेत. पळताना मंगेश काळोखे अचानक रस्त्यावर पडले. त्यानंतर त्यांच्या मागावर असलेल्या ५ जणांनी तातडीने धारदार शस्त्राने हल्ला केला. पाचही जणांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले.

Mangesh Kalokhe case
सामना सुरू होण्याआधीच क्रिकेट कोचचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; क्रीडाविश्वावर शोककळा

या हल्ल्यात काळोखे यांना गंभीर जखमी केल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी रस्त्यावर लोकांची तुरळक संख्या होती. हल्ला करताना कोणीही त्यांना वाचवायला पुढे आलं नाही. काळोखे गंभीर जखमी झाल्यानंतर मारेकऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला. या हत्याकांडाने खोपोलीसह महाराष्ट्र हादरून गेला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com