Crime News: धक्कादायक! घरातील कपाटात 2 वर्ष ठेवला वडिलांचा मृतदेह; कारण ऐकून सरकेल पायाखालची जमीन

Japan Crime News: जपानमध्ये एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलंय. एका व्यक्तीने आपल्या घरातील कपाटात तब्बल दोन वर्ष मृतदेह ठेवल्याची घटना घडल्याचं समोर आलंय.
Thiruvananthapuram Crime
brother and Sister Killed themselves Saam tv
Published On

जपानमध्ये एक धक्कादायक घटना घडलीय. येथील एका व्यक्तीने आपल्या घरातील कपाटात तब्बल दोन वर्ष मृतदेह जपून ठेवलाय. या घटनेने परिसरात खळबळ उडालीय. विशेष म्हणजे हा मृतदेह दुसरा कोणाचा नसून त्या व्यक्तीच्या वडिलांचाच आहे. हा प्रकार जेव्हा समोर आला तेव्हा शहरात खळबळ उडली. टोकियोमधील एक रेस्टॉरंट आठवड्यापासून बंद होतं. रेस्टॉरंट का बंद होतं? याचा तपास करण्यासाठी पोलीस जेव्हा मालकाच्या घरी पोहोचले, तेव्हा त्यांना घरातील एका कपाटात सांगाडा आढळून आला. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला.

Thiruvananthapuram Crime
बहिणीच्या लग्नाला आला अन् अनर्थ घडला, सासऱ्याचा जावयासह लेकीवर धाडsss धाडsss गोळीबार; जळगावमध्ये सैराट

साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, नोबुहिको सुझुक टोकियोमध्ये एका चायनीज रेस्टॉरंटचे मालक आहेत. नोबुहिकोचे रेस्टॉरंट गेल्या आठवड्यापासून बंद होते. ते कोणालाच दिसले नाहीत. रेस्टॉरंट का बंद आहे, हे याचं कारण समजत नसल्यानं स्थानिक लोकांनी पोलिसांना याची माहिती दिली. जेव्हा पोलीस नोबुहिकोच्या घरी पोहोचले तेव्हा कपाटात त्यांच्या वडिलांचा सांगाडा आढळून आला.

धक्कादायक कारण आलं समोर

जेव्हा पोलिसांनी नोबुहिकोला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी सुरू केली तेव्हा त्याने संपूर्ण सत्य उघड केलं. नोबुहिको सुझुकीने सांगितले की त्याच्या वडिलांचे जानेवारी २०२३ मध्ये वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले होते. जेव्हा नोबुहिको कामावरून परतला तेव्हा त्याला त्याचे वडील मृतवस्थेत आढळून आले. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने त्यांचा मृतदेह लपवून ठेवला होता. पण आता वडिलांच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत, परंतु सुझुकीने सांगितलं की घटनेच्या दिवशी जेव्हा तो कामावरून घरी परतला तेव्हा त्याला त्याच्या वडिलांचा मृतदेह आढळला.

Thiruvananthapuram Crime
ड्रायव्हरकडून बलात्कार अन् VIDEO काढून ब्लॅकमेल, ५ मित्रांकडून आळीपाळीनं लैंगिक अत्याचार; पीडितेनं अखेर.. | Crime

वडिलांचा मृतदेह का लपवला?

साउथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, ५६ वर्षीय नोबुहिको म्हणाले की, त्यांच्या वडिलांच्या अंत्यसंस्काराचा खर्च खूप मोठा झाला असता. त्यामुळे आपण मृतदेह कपाटात लपवला. सुरुवातीला नोबुहिकोला खूप वाईट वाटले, पण त्यांनी विचार केला की, त्यांच्या वडिलांच्या मृ्त्यूसाठी ते जबाबदार नाहीत, म्हणूनच त्यांनी मृतदेह बाहेर काढला नाही. पोलिसांनी नोबुहिकोला अटक केली.

पोलीस नोबुहिकोच्या वडिलांच्या मृत्यूचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलिसांना असा संशय आहे की, नोबुहिकोने त्यांच्या वडिलांचे पेन्शन हडपण्यासाठी मृत्यूची बातमी गुप्त ठेवली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com