बहिणीच्या लग्नाला आला अन् अनर्थ घडला, सासऱ्याचा जावयासह लेकीवर धाडsss धाडsss गोळीबार; जळगावमध्ये सैराट

Choprda Daughter and Son in Law Firing : तृप्ती अविनाश वाघ (वय २४) असं मृत मुलीचं नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ (वय २८, दोधे रा.करवंद, शिरपूर, ह.मु. कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता.
Chopda taluka son in law and daughter shot dead
Chopda taluka son in law and daughter shot deadSaam Tv News
Published On

जळगाव : दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केलेल्या स्वत:च्या मुलीवरच आरपीएफधून निवृत्त झालेल्या बापाने गोळी झाडून तिची हत्या केलीय. या गोळीबारात जावईही गंभीर जखमी झाला आहे. तर,घटनेनंतर जमावाने केलेल्या मारहाणीत सासराही जखमी झालाय. गोळीबाराची ही थरारक घटना जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरातील डॉ.आंबेडकर नगरात काल शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. या घटनेनंतर लोकांनी आरोपी वडिलांना मारहाण केली असून यात तेही गंभीर जखमी झाले आहेत.

तृप्ती अविनाश वाघ (वय २४) असं मृत मुलीचं नाव आहे. तृप्ती हिने दोन वर्षापूर्वी अविनाश ईश्वर वाघ (वय २८, दोधे रा.करवंद, शिरपूर, ह.मु. कोथरूड, पुणे) याच्याशी प्रेमविवाह केला होता. आरोपी सासरे किरण अर्जुन मंगले (वय ४८, रा.शिरपूर) यांना हा विवाह पसंत नव्हता. आपल्या बहिणीच्या विवाह समारंभासाठी अविनाश आणि तृप्ती हे शनिवारी सायंकाळी चोपड्यालाच आले होते.

Chopda taluka son in law and daughter shot dead
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींच्या हफ्त्यात वाढ करुन देण्यावरुन बड्या नेत्याचा 'यू-टर्न', २१०० रुपये देऊ असं म्हटलंच नाही...

तृप्तीने प्रेमविवाह केल्याचा राग वडील किरण अर्जुन मंगले यांच्या मनात होता. अविनाश आणि आपली मुलगी लग्नाला शहरात आल्याची कुणकुण तृप्तीच्या वडिलांना लागली. त्यात त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर आणि तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. यात मुलगी तृप्ती ठार झाली तर जावई अविनाश याला पाठीला आणि हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

हळदीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर किरण आणि तृप्ती हे समोरासमोर आले. तृप्ती हिला पाहताच किरण मंगले यांनी त्यांच्याकडील रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. तिला वाचवण्यासाठी अविनाश गेला असता तोही गोळी लागून जबर जखमी झाला.अविनाश याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला जळगावला हलविण्यात आलं आहे. नातेवाईकांनी किरण मंगले यांना मारहाण केली. दरम्यान, शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेही यांनी चोपड्यात जाऊन घटनेची माहिती घेतली.

Chopda taluka son in law and daughter shot dead
Pahalgam Terror Attack : दहशतवाद्यांकडून बेछूट गोळीबार, मागे महिलेचा किंचाळण्याचा आवाज; काश्मीरी मुलानं तान्ह्या बाळाला वाचवलं, अंगावर काटा आणणारा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com