Crime News: नवरदेवाला 200 रुपयांची नोट दाखवत विचारला एक प्रश्न; उत्तर ऐकताच नवरीने मोडलं लग्न

Crime News: बिहारमध्ये लग्नाच्या वेळी बनावट नवरदेव असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला. 200 आणि 2000 रुपयांच्या नोटेतील फरक न कळल्याने संशय बळावून अखेर लग्न मोडण्यात आले.
Crime News Bihar Dulhan Gave Dulha 200 Rupee Note And Asked Him Questions Then Broke Off Marriage
Crime News Bihar Dulhan Gave Dulha 200 Rupee Note And Asked Him Questions Then Broke Off Marriage Saam Tv
Published On

Crime News: बिहार राज्यातील मुजफ्फरनगर परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच विचित्र घटना समोर आली आहे. लग्नाच्या शेवटच्या टप्प्यावर नवरीसोबत होत असलेली मोठी फसवणूक उघडकीस आल्यानंतर अखेर हे लग्न मोडण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मनियारी भागात पारंपरिक पद्धतीने लग्नसोहळा सुरू होता. रात्रीभर सर्व विधी पार पडले आणि सर्व काही सुरळीत सुरु होते. मात्र, नवरीच्या कुटुंबीयांना नवरदेवाबाबत सुरुवातीपासूनच काहीसा संशय वाटत होता. तरीही तो गैरसमज असावा, असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले.

Crime News Bihar Dulhan Gave Dulha 200 Rupee Note And Asked Him Questions Then Broke Off Marriage
Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या निवडणूकीत मोठा ट्विस्ट; ममता बॅनर्जी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नाहीत

परंतु सकाळी पाठवणीच्या वेळी एक अनपेक्षित प्रकार घडला. उपस्थितांपैकी एका महिलेनं नवरदेवाला 200 रुपयांची नोट देऊन तिची किंमत विचारली. यावर नवरदेवाने ती 2000 रुपयांची नोट असल्याचे सांगितले. या उत्तरामुळे सर्वांना धक्का बसला आणि संशय अधिकच बळावला.

Crime News Bihar Dulhan Gave Dulha 200 Rupee Note And Asked Him Questions Then Broke Off Marriage
Singer Fire Herself: प्रसिद्ध गायिकेने स्वत:च पेटवून घेतलं? सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमागचं सत्य काय? - Fact Check

यानंतर नवरीच्या कुटुंबीयांनी नवरदेवाबाबत सखोल चौकशी केली. चौकशीत समोर आले की, ज्या मुलासोबत लग्न ठरले होते, तो व्यक्ती हा नवरदेवच नाही. म्हणजेच संपूर्ण लग्न सोहळा बनावट नवरदेवासोबत पार पडत होता.

या प्रकारामुळे दोन्ही कुटुंबांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. नवरीच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत, “ज्याला 200 आणि 2000 रुपयांचा फरक समजत नाही, तो आयुष्याची जबाबदारी कशी सांभाळणार?” असा सवाल उपस्थित केला. अखेर, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने नवरीच्या कुटुंबीयांनी लग्न मोडण्याचा निर्णय घेतला आणि मुलीची पाठवणी करण्यास ठाम नकार दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com