Jalgaon Crime: सिनेस्टाईलने पोलिसांनी पकडला गांजा तस्कर; जप्त केला १९ किलोचा अमली पदार्थ

Crime: जळगाव कासोदा पोलिसांनी गांजा विक्रीबाबत मिळालेल्या माहितीनुसार एका आरोपीला १९ किलो गांजा आणि मोटारसायकलसह २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह अटक केली आहे. एनडीपीएस कारवाई झाली.
Jalgaon Crime
Jalgaon Crimesaam tv
Published On

जळगाव कासोदा पोलीस ठाणे हद्दीतील गांजा विक्रीच्या बाबतीत पोलीसांना महत्त्वपूर्ण गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी एका संशयित आरोपीला १९ किलो गांजा आणि एक मोटारसायकल एकूण २ लाख ८० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी आरोपीविरोधात एनडीपीएस कायद्याखाली कारवाई केली आहे.

गुप्त माहिती मिळाल्यानंतर, कासोदा परिसरात गांजा विक्री होत असल्याचा संशय पोलिसांना आला. त्यानंतर, पोलीस पथकाने वेशांतर करून गांजा पकडण्यासाठी सापळा रचला होता. सुरवातीचे चार दिवस अपयश आले, पण पोलीसांचा पेट्रोलिंग सुरूच होता. त्याचदरम्यान, वनकोठे गावाजवळ एका संशयित व्यक्तीने मोटारसायकलवर प्लास्टिकच्या गोणीत गांजा आणताना पोलीसांना माहिती मिळाली.

Jalgaon Crime
Maharashtra Weather: महाराष्ट्रात येणार उष्णतेची लाट! राज्यातील 'या' शहरांमध्ये पारा ३७ ते ४० अंशावर

त्यानंतर, पोलिसांनी त्वरित त्या ठिकाणी पोहोचून मोटारसायकल आणि गोणीची तपासणी केली. तपासणीदरम्यान, गोणीत खाकी रंगाच्या पॅकींग टेपने चौकोनी आकाराचे पॅकेट्स मिळाली. या पॅकेट्समध्ये गांजा असल्याचे सिद्ध झाले. या कारवाईमुळे पोलिसांनी मोठ्या प्रमाणात गांजा जप्त केला आणि आरोपीला ताब्यात घेतले.

Jalgaon Crime
NCP VS Shivsena: फिक्सरचा मुद्दा, मित्र पक्षांनाच गुद्दा; शिंदेंच्या नेत्यावर राष्ट्रवादीचा वार

आरोपीविरुद्ध एनडीपीएस कायद्याअंतर्गत कारवाई करत त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. पोलीस प्रशासनाने गांजा विक्रीच्या प्रकरणात पुढील तपास सुरू ठेवला असून, आरोपीच्या इतर साथीदारांचा शोध घेतला जात आहे. यामुळे कासोदा परिसरात मोठ्या प्रमाणात गांजा विक्री रोखली जाऊ शकते, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Jalgaon Crime
Mumbai Crime News: अंधेरीतील घरफोडीचा गुन्हेगार उत्तर प्रदेशातून गजाआड, मुंबई पोलिसांची मोठी कारवाई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com