Chandrapur Crime News : बदलापूर येथील चिमुकल्या मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे महाराष्ट्रात संतप्त वातावरण आहे. महाराष्ट्रभर याचा निषेध नोंदवला जात असतानाच चंद्रपूरमधील एका घडनेमुळे खळबळ उडाली आहे. चंद्रपुरमध्ये ST स्टँडच्या टॉयलेटमध्ये एका मनोरुग्ण तरुणीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धक्कादायक म्हणजे, या प्रसंगाचा व्हिडिओ शूट केला.
नागभीड येथे 25 वर्षीय मनोरुग्ण मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याचं उघड झालेय. नव्या बस स्टँडच्या निर्जन प्रसाधनगृहात नराधमांनी मनोरुग्ण तरुणीवर अत्याचार केला. 12 ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास ही घटना घडल्याचं समोर आले आहे. या घटनेचा आरोपीच्या सहका-यांनी व्हिडीओ काढला होता. आता चंद्रपूरमध्ये हा व्हिडिओ व्हायरल झाला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत नागभीड शहरातील शेकडो नागरिकांनी या प्रकाराविरोधात पोलिसात धाव घेतली. सोबतच आरोपींना कठोर शिक्षेची मागणी करत दबाव वाढविला.
पोलिसांनी व्हायरल व्हिडिओची तपसणी करत तपास सुरु केला. विविध तुकड्या स्थापन करत मुलीचा माग काढला. त्यासोबतच पाच आरोपींना तीन तासांत बेड्या ठोकल्या. पोलीस पाच आरोपींचा कसून तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात योग्य चौकशी आणि कठोर कारवाईचे आश्वासन पोलीस अधिक्षकांनी दिले आहे. सोबतच हा कथित व्हिडीओ कुणालाही पाठवू नका, कारवाई ओढवून घेऊ नका अशी ताकीदही त्यांनी दिली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.