Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने कृत्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली

Buldhana Crime: बुलडाण्यात नवऱ्याने बायकोची हत्या केली. चारित्र्याच्या संशयावरून ही हत्याकांडाची घटना घडली. आरोपीने बेसबॉल स्टिकने मारहाण करत बायकोला संपवलं.
Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने कृत्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली
Buldhana CrimeSaam Tv
Published On
  • बुलडाण्यात चारित्र्याच्या संशयातून नवऱ्याने बायकोची हत्या केली

  • खामगावमध्ये ही हत्याकांडाची घटना घडली

  • बेसबॉल स्टिकने मारहाण करत नवऱ्याने बायकोला संपवलं

  • चारित्र्याच्या संशयावरून ही घटना घडली

संजय जाधव, बुलडाणा

बुलडाण्यामध्ये नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. चारित्र्याच्या संशयातून त्याने बायकोला संपवलं. बुलडाण्याच्या खामगाव शहरातील गोपाल नगर परिसरात ही घटना घडली. चारित्र्याच्या संशयावरून आरोपी सतत बायकोसोबत वाद घालायचा. याच रागातून त्याने बेसबॉल स्टिकने मारहाण करत बायकोची हत्या केली.

चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या केली. बेसबॉल स्टिकने बेदम मारहाण करत आरोपीने बायकोला जागीच संपवलं. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत त्याला बेड्या ठोकल्या. गणेश डाबेराव असं आरोपीचे नाव आहे. त्याने बायकोची हत्या केल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला.

Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने कृत्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली
Crime: १६ वर्षीय मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार, घरच्यांवर नाराज होऊन घराबाहेर पडली अन् भयंकर घडलं

रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास गणेश डाबेरावच्या घरातून अचानक मोठ्याने आरडाओरडा केल्याचा आणि भांडणाचा आवाज आल्याने परिसरातील नागरिकांनी त्याच्या घरासमोर मोठी गर्दी केली. यावेळी जमलेल्या नागरिकांनी आरोपीला काय झाले असं विचारलं असता त्याने माझ्या बायकोचे कुणासोबत तरी लफडं आहे त्यामुळे मी तिला संपवलं असं सांगितलं. त्यामुळे सर्वांना धक्का बसला.

Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने कृत्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली
Crime: रायगड हादरले! १६ वर्षीय मुलीवर बलात्कार, मित्रानेच केलं भयंकर कृत्य

आरोपीच्या घराच्या आतील चित्र पाहून सर्वजण घाबरले. रक्ताच्या थारोळ्यात त्याची बायको पडली होती. त्यानंतर नागरिकांनी घटनेची माहिती फोन करून शिवाजीनगर पोलिसांना दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत आरोपीला अटक केली. आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरून गेला.

Crime: बायकोच्या चारित्र्यावर संशय, नवऱ्याने कृत्य पाहून सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली
Crime : प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या समर्थकाला संपवलं, घराजवळच भयंकर हल्ला; शहरात प्रचंड खळबळ

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com