Political Survey: महागाई आणि बेरोजगारीचा मुद्दा लोकांसाठी किती महत्वाचा आहे? सर्व्हेतून 'ही' माहिती उघड

Political Survey News Update :भाजप मंत्री ते कार्यकर्ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारी योजनेच्या माध्यमातून मतदारांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत. या मतदारांचे मुद्द्याविषयीचा सर्व्हे 'एबीपी' वृत्तसंस्थेने केला आहे.
dadar market, File Photos
dadar market, File PhotosSaam tv
Published On

Political News In Marathi:

आगामी लोकसभा निवडणुकीचे वेध सर्व राजकीय पक्षांना लागले आहे. निवडणुकीचे वेध लागल्याने राजकीय नेत्यांनी कंबर कसली आहे. भाजपने पुन्हा एकदा सत्तेवर येणार असल्याचा दावा केला आहे. तर दुसरीकडे २० हून अधिक पक्षांनी एकत्र येत 'इंडिया' आघाडीची स्थापना केली आहे. (Latest Marathi News)

भाजप सरकारने नवीन वर्षाच्या सुरुवातीला अयोध्या येथील राम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याचा आयोजन २२ जानेवारीला केलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या मंदिराचं उद्घाटन करणार आहेत. याचदरम्यान राम मंदिराच्या श्रेयवादावरून राजकारण सुरु झालं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दुसरीकडे अबू धाबीतील पहिल्या हिंदू मंदिराचं लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या मंदिराच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला होता.

भाजप मंत्री ते कार्यकर्ते विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारी योजनेच्या माध्यमातून मतदारांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरु केले आहेत. या मतदारांचे मुद्द्याविषयीचा सर्व्हे 'एबीपी' वृत्तसंस्थेने केला आहे.

dadar market, File Photos
Manipur Clash : मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; ३ जणांची गोळ्या झाडून हत्या, संचारबंदी लागू

महागाईचा मुद्दा किती महत्वाचा?

सर्व्हेत देशात महागाईचा मुद्दा महत्वाचा आहे का, याबाबत प्रश्न विचारण्यात आला. याचं ५६ टक्के लोकांनी महागाईचा मुद्दा 'अत्यंत महत्वाचा' असल्याचं म्हटलं आहे. २१ टक्के लोकांनी 'काही प्रमाणात महत्वाचा' असल्याचं म्हटलं आहे. तर १७ टक्के लोकांनी मुद्दा महत्वाचा नसल्याचं म्हटलं आहे. तर ६ टक्के लोक काहीच सांगू शकले नाही.

dadar market, File Photos
CJI DY Chandrachud: अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निकालावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांची महत्वाची टिप्पणी , म्हणाले..

बेरोजगारीचा मुद्दा किती महत्वाचा?

सर्व्हेत देशात बेरोजगारीचा मुद्दा किती महत्वाचा आहे,याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. तर यात ६१ टक्के लोकांनी मुद्दा 'अत्यंत महत्वाचा' असल्याचं म्हटलं आहे. १९ लोकांनी लोकांनी मुद्दा 'काही प्रमाणात महत्वाचा' असल्याचं म्हटलं आहे. तर १५ टक्के लोकांनी मुद्दा महत्वाचा नसल्याचं म्हटलं आहे. तर ५ टक्के लोक काहीच सांगू शकले नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com