गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडचा बंद खोलीत सापडला मृतदेह; 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

Live In Couple Found Dead In Greater Noida Room Investigation: ग्रेटर नोएडामध्ये लिव्ह-इन कपलचा बंद खोलीत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रियकराने आधी प्रेयसीची हत्या करून नंतर आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Police investigate after decomposed bodies of a live-in couple were discovered inside a locked room in Greater Noida.
Police investigate after decomposed bodies of a live-in couple were discovered inside a locked room in Greater Noida.india tv
Published On

ग्रेटर नोएडातील नॉलेज पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या तुगलपूर भागात एका लिव्ह-इन कपलचे मृतदेह त्यांच्या भाड्याच्या खोलीत आढळल्याने खळबळ माजली आहे. गुड्डू पासवान उर्फ गोलू (30) आणि त्याची पार्टनर ज्योती असे मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गुड्डू आणि ज्योती गेल्या तीन वर्षांपासून तुगलपुरमध्ये भाड्याने राहत होते. रात्रीच्या सुमारास त्यांच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दरवाजा तोडला असता, आत गुड्डूचा मृतदेह छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला, तर ज्योतीचा मृतदेह बेडवर पडलेला होता.

Police investigate after decomposed bodies of a live-in couple were discovered inside a locked room in Greater Noida.
Mumbai : 'तुझे ते फोटो व्हायरल करेन', महिला क्रिकेटपटूला मुंबई पोलिसांकडून अटक, प्रसिद्ध व्यवसायिकाला सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात अडकवलं

दोघेही मुळचे देवरिया येथील रहिवासी होते. ज्योती एका खासगी रुग्णालयात हाऊसकीपिंगचे काम करायची, तर गुड्डू बेरोजगार होता. मागील 20 दिवसांपासून ज्योती कामावर गेली नव्हती, ज्यामुळे घरात पैशांची कमतरता निर्माण झाली होती. गुड्डूच्या बेरोजगार असण्यावरून त्यांच्यात अनेकदा कडाक्याची भांडणे व्हायची, अशी माहिती शेजाऱ्यांनी दिली.

Police investigate after decomposed bodies of a live-in couple were discovered inside a locked room in Greater Noida.
Crime news: घरचे बाहेर गेले असताना घरात घुसला अन्..; शेजारी राहणाऱ्या तरूणाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, राज्यात खळबळ

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, गुड्डूने प्रथम ज्योतीची हत्या केली असावी आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली असावी. मृतदेह दोन दिवसांपूर्वीचे असावेत असा अंदाज आहे, कारण घरातून दुर्गंधी सुटली होती. खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी दरवाजा तोडून प्रवेश केला. घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com