Dhule Crime: बांधकाम करणाऱ्या बिहारी मजुराची नियत फिरली; 40 वर्षीय महिलेचा विनयभंग

Mob Assaults Accused After Molestation : धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात ४० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना घडलीय. याप्रकरणी बिहारमधील एका मजुराला अटक करण्यात आली आहे. संतप्त ग्रामस्थांनी आरोपीला मारहाण करून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
Mob Assaults Accused After Molestation
Police detain the accused after villagers assaulted him in Taradi village following a molestation incident.saam tv
Published On
Summary
  • शिरपूर तालुक्यातील तरडी गावात 40 वर्षीय महिलेचा विनयभंग

  • आरोपी बिहारी मजुराला गावकऱ्यांकडून मारहाण

  • पोलिसांनी वेळेत हस्तक्षेप करून आरोपी ताब्यात घेतला

भूषण अहिरे, साम प्रतिनिधी

बिहारी मजुराने 40 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शिरपूर तालुक्यातील तरडी गावात घडला. यानंतर गावातील लोकांनी संबंधित बिहारी मजुराला चोप दिला, त्यानंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. बिरेंद्रकुमार समाधीन यादव (वय 27), असं मजुराचे नाव आहे. गावकऱ्यांनी आरोपीला पोलिसांसमोरच मारहाण केली.

Mob Assaults Accused After Molestation
Crime : धक्कादायक! चाकूने छाती व पोटावर वार, भाजप नगरसेविकेच्या पतीवर प्राणघातक हल्ला

शिरपूर तालुक्यातील तरडी गावात ही घटना घडली आहे, पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावातून या आरोपीला ताब्यात घेतले, त्यानंतर जमावाने आरोपीला आमच्या ताब्यात द्या, अन्यथा पोलिस वाहन जाळण्याची धमकी संतप्त जमावाने दिली त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना शांत केले, काही काळ तणावाचे वातावरण गावात निर्माण झाले होते, संबंधित आरोपी विरोधात पोलिसांनी टाळणे पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास थाळनेर पोलीस करीत आहेत.

Mob Assaults Accused After Molestation
Shocking : आजारपणाला वैतागला, ३० वर्षाच्या तरूणाची आत्महत्या; भंडाऱ्यात हळहळ

विधवा महिलेवर सलग १२ तास आळीपाळीने सामूहिक अत्याचार

वीटभट्टीवर काम करणाऱ्या एका विधवा महिलेवर वीटभट्टी मालकाने आणि त्याच्या मित्रांनी मिळून अत्याचार केल्याची घटना घडलीय. सलग १२ तास महिलेवर अत्याचार करण्यात आला. नराधमाच्या तावडीतून सुटका करून घेत महिलेने पोलीस ठाणे गाठले आणि आरोपींविरोधात तक्रार दाखल केली. या घटनेने गावात खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचं नाव विजय कुशवाहा असे आहे. काही दिवसांपूर्वी पीडित महिलेच्या पतीचं निधन झालं. त्यानंतर महिलेने वीटभट्टीवर काम करण्यास सुरुवात केली. तिच्या एकटेपणाचा फायदा घेत वीटभट्टी मालकाने तिच्यावर अत्याचार केला.

९ फेब्रुवारी रोजी रात्री विजय कुशवाहा याने दोन साथीदारांसह पीडितेचं अपहरण केले. त्यानंतर तिला पडरौना येथील एका खोलीत डांबून ठेवलं. तिथेच सलग १२ तास तिच्यावर अत्याचार करण्यात आले. हे तिघे ही आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केले. दरम्यान संधी मिळताच महिलेने त्यांच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली. त्यानंतर महिलेने थेट पोलीस ठाणे गाठले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com