कौटुंबिक वाद शिगेला पोहोचला, संतापलेल्या पत्नीनं नवऱ्याला 'नको तेथे मारलं', अन्...; मुंगेरमधील धक्कादायक घटना

Wife Attack On Husband: बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या नवऱ्याच्या प्रायव्हेट पार्टवर धारदार शस्त्राने हल्ला केला. यात तो व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरू केली आहे.
Wife Attack On Husband
Police investigate after a violent domestic dispute in Bihar's Munger district left a man injured and sparked local concern.
Published On
Summary
  • बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना घडली.

  • संतापलेल्या पत्नीने पतीवर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचा आरोप आहे.

  • जखमी पतीला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

बिहारमधील मुंगेर जिल्ह्यातील पूर्वसराय पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाहजुवीर रोड परिसरात पती-पत्नीतील कौटुंबिक वादातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापात पत्नीने पतीच्या गुप्तांगावर धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात पती गंभीर झाला. या घटनेनंतर महिला आपल्या चार महिन्यांच्या मुलीसह घरातील दागिने घेऊन फरार झाली.

Wife Attack On Husband
Shocking : १९ वर्षीय प्रेयसीला संपवलं! मृतदेह जंगलात फेकला; हैवान बॉयफ्रेंडचं धक्कादायक कृत्य

या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जखमी झालेल्या मोहम्मद फैसल खान यांना त्यांच्या कुटुंबीयांनी तातडीने मुंगेर सदर रुग्णालयात दाखल केले आहे. डॉक्टरांनी त्यांच्या गुप्तांगावर चार टाके घातले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

Wife Attack On Husband
Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

मिळालेल्या माहितीनुसार, फैसल यांचा विवाह १३ एप्रिल २०२५ रोजी भागलपूर जिल्ह्यातील कबीरपूर येथील इशरत हसन उर्फ सानिया हिच्याशी झाला होता. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरुळीत सुरू होतं. मात्र, काही काळानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागला. फैसल यांनी आरोप केला की, त्यांच्या पत्नीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते आणि ती त्या व्यक्तीशी सतत फोनवर संपर्कात असायची.

याच कारणावरून पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होते. तसेच पत्नीने स्वतंत्र राहण्याची मागणीही केली होती. घटनेच्या आदल्या दिवशीही सानिया आणि फैसल यांच्या आईमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे. घटनेच्या रात्री फैसल कामावरून घरी परतल्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. याचदरम्यान संतापाच्या भरात पत्नीने धारदार शस्त्राने त्यांच्या गुप्तांगावर हल्ला केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेला फैसल रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्यानंतर आरोपी पत्नी घरातून निघून गेली.

दरम्यान, पूर्वसराय पोलीस ठाण्याचे अधिकारी सौरभ कुमार यांनी सांगितले की, हा पती-पत्नीमधील कौटुंबिक वादाचा प्रकार आहे. प्राथमिक तपासात पतीकडून पत्नीला मारहाण होत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे नोंदवून घेतले असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. फैसल यांनी आपल्या मुलीला परत मिळवून देण्याची आणि पत्नीविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com