Nashik : नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार , अल्पवयीन मुलीची प्रसूतीनंतर बाळ विकलं; दोन नामांकीत डॉक्टरांसह ११ जणांना ठोकल्या बेड्या

Nashik Malegaon News : नाशिकच्या मालेगावात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून नवजात बालकाची विल्हेवाट लावल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नामांकित डॉक्टरांसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
MALEGAON ILLEGAL DELIVERY CASE: 11 BOOKED INCLUDING DOCTORS OVER NEWBORN DISPOSAL ALLEGATIONS
MALEGAON ILLEGAL DELIVERY CASE: 11 BOOKED INCLUDING DOCTORS OVER NEWBORN DISPOSAL ALLEGATIONSSaam Tv
Published On
Summary
  • मालेगावात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती केल्याचा गंभीर आरोप

  • जन्मलेल्या नवजात बालकाची विल्हेवाट लावल्याचे प्रकरण उघड

  • नामांकित डॉक्टरांसह ११ जणांविरोधात गुन्हा दाखल

  • पॉक्सो कायद्यासह विविध कलमान्वये पोलिसांनी कारवाई सुरू केली

अजय सोनावणे, नाशिक

नाशिकच्या मालेगावातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मालेगाव शहरात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती करून जन्मलेल्या नवजात बाळाची विक्री केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन नामवंत डॉक्टरांसह एकूण ११ जणांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण आरोग्य विभागात खळबळ उडाली असून पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीची एका खाजगी रुग्णालयात प्रसूती करण्यात आली होती. या प्रसूतीनंतर जन्मलेल्या नवजात बाळाची परस्पर विक्री करण्यात आली. या प्रकरणात मालेगाव सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक राहिलेले डॉ. किशोर डांगे यांच्यासह ११ जणांविरोधात पॉक्सो कायदा तसेच बेकायदेशीर प्रसूती आणि बालकाच्या व्यवहारासंदर्भातील विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MALEGAON ILLEGAL DELIVERY CASE: 11 BOOKED INCLUDING DOCTORS OVER NEWBORN DISPOSAL ALLEGATIONS
Flight Service Closed : प्रवाशांसाठी मोठी बातमी! सोलापूर-गोवा , हैदराबाद विमानसेवा पुढील ३ महिन्यांसाठी बंद राहणार

अटक करण्यात आलेल्या डॉक्टरांपैकी काही जण वैद्यकीय क्षेत्रातील परिचित नावे असल्याने या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. डॉ. किशोर डांगे हे कोरोना महामारीच्या काळात मालेगाव सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक म्हणून कार्यरत होते. निवृत्तीनंतर त्यांनी स्वतःचे खासगी रुग्णालय सुरू केले होते. मात्र, मालेगाव सामान्य रुग्णालयात कार्यरत असतानाही ते विविध वाद-विवादांमुळे चर्चेत राहिले होते.

MALEGAON ILLEGAL DELIVERY CASE: 11 BOOKED INCLUDING DOCTORS OVER NEWBORN DISPOSAL ALLEGATIONS
Gold Rate Update : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात ४,६९० रुपयांनी सोनं स्वस्त, वाचा ताजे दर

दरम्यान, या प्रकरणातील सर्व आरोपांची सखोल चौकशी पोलीस करत आहेत. या गंभीर प्रकरणामुळे आरोग्य यंत्रणेतील कामकाज, अल्पवयीन मुलींचे संरक्षण आणि बालकांच्या हक्कांबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले असून तपासातून नेमके सत्य काय समोर येते याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com