बंगळूरुमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका अपार्टमेंटमध्ये एका कुटुंबातील तिघांची निर्घृण करण्यात आली आहे. या प्रकरणात कुटुंबातील मोठी मुलगी श्वेता हिच्यावरच हत्या केल्याचा आरोप असून तिने तिचा प्रियकर केनेथ याच्या मदतीने हा गुन्हा केल्याचा पोलिसांना संशय आहे. घटनेनंतर दोघेही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता तिच्या प्रियकरासोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. मात्र तिचे आई वडील सोमसुंदर आणि मुथुलक्ष्मी या नात्याला विरोध करत होते. याच कारणामुळे कुटुंबात वारंवार वाद होत असायचे आणि त्यातूनच ही घटना घडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही घटना केआर पुरम पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या साई ग्रीन अपार्टमेंट, धामनिक लेआउट, सीगेहल्ली येथे घडली. श्वेतावर तब्बल 30 लाख रुपयांचे कर्ज असल्याचेही समोर आले असून, यावरूनही घरात तणाव निर्माण झाला होता.
माहितीनुसार, सोमवारी श्वेता तिच्या प्रियकरासोबत कुटुंबीयांना भेटण्यासाठी घरी आली होती. त्यावेळी घरात फक्त आई मुथुलक्ष्मी उपस्थित होती. वडील सोमसुंदर आणि धाकटी बहीण सुप्रिया बाहेर गेले होते.
दरम्यान, श्वेता, केनेथ आणि मुथुलक्ष्मी यांच्यात जोरदार वाद झाला. या वादाच्या दरम्यान मुथुलक्ष्मी यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपींनी बाथरूममध्ये रक्ताचे डाग धुवून टाकल्याचेही समोर आले आहे. थोड्याच वेळात सुप्रिया घरी परतली असता, श्वेताने तिला पकडले आणि केनेथने तिचीही हत्या केली. त्यानंतर दोघांनी मिळून वडील सोमसुंदर यांच्यावरही हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत ते पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र नंतर त्यांचा मृत्यू झाला.
पोलीसांनी घटनास्थळी पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. आरोपी श्वेता आणि केनेथ यांचा शोध सुरू असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.