मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडले, जीएसटी विभागात खळबळ

GST inspector arrested : जीएसटी नोंदणी क्रमांक देण्यासाठी व्यापाऱ्याकडून १० हजार रुपयांची लाच घेताना राज्य कर निरीक्षक संदीप खलाटे याला एसीबीने रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे जीएसटी विभागात खळबळ उडाली आहे.
Akola News
Akola NewsSaam tv
Published On

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) भ्रष्टाचारविरोधात मोठी कारवाई करत महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर (GST) विभागाच्या एका निरीक्षकाला (Inspector) रंगेहाथ अटक केली आहे. एका व्यापाऱ्याकडून तब्बल १०,००० रुपयांची लाच घेताना ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे शासकीय वर्तुळात आणि जीएसटी विभागात एकच खळबळ उडाली आहे.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) नोंदणी क्रमांक देण्यासाठी एका अर्जदाराकडून १०,००० रुपयांची लाच घेताना एसाबीने जीएसटी अधिकाऱ्याला पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोने (एसीबी) गुरुवारी जीएसटी विभागातील एका राज्य कर निरीक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानासुरा, त्या अधिकाऱ्याचे नाव संदीप खलाटे असे आहे. संदीप हे माझगाव येथील जीएसटी विभागाच्या नोडल-७ मध्ये कार्यरत आहे.

Akola News
'लाचेचा' कारभार! क्लास वन अधिकारी दीड लाखांची लाच घेताना रंगेहाथ सापडला, दोघे जण 'एसीबी'च्या ताब्यात

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने जीएसटी क्रमांकासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. नोंदणी प्रक्रिया व जीएसटी क्रमांक जारी करण्यासाठी खलाटेने कथितरित्या १०,००० रुपये मागितले होते. लाच देण्यास तयार नसल्याने, तक्रारदाराने एसीबीच्या वरळी युनिटशी संपर्क साधला. त्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून १०,००० रुपयांची लाच स्वीकारताना खलाटे रंगेहाथ पकडला गेला.

Akola News
Mumbai : मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा फसला जाळ्यात

या रंगेहाथ कारवाईनंतर एसीबीच्या पथकाने तात्काळ आरोपी अधिकारी संदीप खलाटे याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये (Prevention of Corruption Act) गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय, लाचखोर अधिकाऱ्याने अशा प्रकारे आणखी किती जणांची अडवणूक करून पैसे उकळले आहेत का, याचा शोध घेण्यासाठी एसीबीने आता खलाटे यांच्या निवासस्थानाची आणि माझगाव येथील कार्यालयातील संशयास्पद कागदपत्रांची झडती (Search Operation) सुरू केली आहे. शासकीय अधिकाऱ्याने उघडपणे लाच मागितल्याच्या या प्रकरणामुळे व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com