Crime News: नवरा शरीरसंबंध टाळायचा, अचानक एक फाइल बायकोला सापडली; सत्य उघड होताच पायाखालची जमीन सरकली

Marriage fraud case: कानपूरमध्ये लग्नानंतर पतीने आजार आणि पहिलं लग्न लपवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवविवाहितेने पोलिसात तक्रार दाखल केली असून किडनी किंवा 20 लाखांची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.
marriage
marriageGoogle
Published On

लग्न हा प्रत्येक जोडप्यासाठी एक आनंदाचा क्षण असतो. मात्र उत्तर प्रदेशाच्या कानपूरमधील एका नवविवाहितेसाठी लग्न जणू एक वाईट स्वप्न ठरलंय. लग्नानंतर जे सत्य समोर आलं त्यामुळे तिला मोठा धक्का बसला. मुलीने असा आरोप केलाय की, तिच्या पतीला गंभीर आजार असून तो अगोदरच विवाहित आहे. या गोष्टी तिच्या घरच्यांपासून लपवून ठेवल्या गेल्या. दरम्यान जेव्हा तिने ही गोष्टी सासरच्या मंडळींना सांगितली तेव्हा त्यांनी तिच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.

लग्नानंतर पती विचित्र वागायचा

उत्तर प्रदेशाच्या कानपूरमधून एक भयंकर प्रकार उघड झाला आहे. या महिलेच्या सांगण्यानुसार, लग्नानंतर तिच्या पतीचं वागणं अजिबात सामान्य नव्हतं. पती तिच्या जवळ यायचा नाही आणि शारीरिक संबंध ठेवण्यासही तो कचरत असे. त्याच्या या वागण्याने महिलेला काहीसा संशय आला. मात्र प्रकरणं असं असेल याचा तिने विचारही केला नव्हता.

marriage
Video Viral: पॅरासेलिंगदरम्यान दोरी तुटली आणि....! बागा बीचवर धक्कादायक घटना, व्हिडीओ समोर

फाइलमधून उघड झाला गंभीर आजार

एक दिवस घरात ठेवलेली फाइल तिच्या हातात लागली आणि ती वाचताच तिच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला. त्या फाईलमधून तिला कळलं की, तिच्या पतीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत आणि तो गुपचूप डायलिसिस करत होता. सर्वात धक्कादायक म्हणजे ही गोष्ट संपूर्ण सासरच्या लोकांना माहिती होती पण जाणूनबुजून ती तिच्यापासून लपवण्यात आली होती.

20 लाखांची मागणी

दरम्यान ही गोष्ट समजताच महिला चांगलीच संतापली. ज्यावेळी त्या महिलेने हा प्रकार समोर आणला तेव्हा पतीने तिच्याकडेच पैशांची मागणी केली. यावेळी पतीने तिला सांगितलं की, तिने तिची एक किडनी द्यावी किंवा माहेरहून 20 लाख रुपये आणावेत. जेणेकरून तो किडनी ट्रान्सप्लांट करू शकेल. एवढंच नाही तर पैसे किंवा किडनी मिळाल्यानंतर तो तिला सोडून दुसरं लग्न करेल असंही त्याने सांगितल्याचा आरोप आहे.

marriage
Doctor death case: मी तिला मारून टाकलं...! एनेस्थेसियाचा ओव्हरडोस देऊन डॉक्टरने केली पत्नीची हत्या, गर्लफ्रेंडसोबतच्या चॅटमधून खुलासा

पती आधीपासूनच विवाहित असल्याचा धक्का

प्रकरणाची अधिक चौकशी करताना महिलेसमोर आणखी एक बाब उघड झाली. तिचा पती आधीच विवाहित असल्याचा तिला धक्का बसला. त्याची पहिली पत्नी वाराणसी येथे राहत असून त्या लग्नातून त्यांना एक मुलगीही आहे. दुसरं लग्न केवळ उपचारासाठी पैसे किंवा किडनी मिळवण्यासाठीच केला गेल्याचा गंभीर आरोप करण्यात तिने पतीवर लावला आहे.

महिलेची पोलिसात धाव

या प्रकरणी मुलीने पोलिसात धाव घेतली आहे. चकेरी पोलीस ठाण्यानुसार, महिलेच्या तक्रारीच्या आधारे तिचा पती आणि सासरच्या मंडळींविरुद्ध हुंड्याप्रकरणी छळ आणि फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता आजार लपवणे, मानसिक आणि शारीरिक छळ यासह सर्व बाबींचा तपास करत असून तपासानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल.

marriage
Doctor death case: मी तिला मारून टाकलं...! एनेस्थेसियाचा ओव्हरडोस देऊन डॉक्टरने केली पत्नीची हत्या, गर्लफ्रेंडसोबतच्या चॅटमधून खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com