Pune Crime : पर पुरुषाबरोबर शरीर संबंध ठेव, नाहीतर...; मित्राच्या बायकोला धमकी, महिला पोलीस निलंबित

Anagha Dhavale Female police constable Suspended : पुण्यात एका महिला शिपायाने मित्राच्या बायकोला पर पुरूषासोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकावल्याचं समोर आलंय. यामुळे या महिला पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.
महिला पोलीस
Anagha Dhavale Female police constable Saam Tv
Published On

नितीन पाटणकर, साम टीव्ही पुणे

पुण्यामध्ये एका महिला पोलीस शिपायाने मित्राच्या बायकोला धमकावलं, तिला पर पुरूषासोबत शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केल्याची घटना समोर आलीय. या घटनेनंतर त्या महिला पोलीस शिपायाला निलंबित करण्यात आलेलं आहे. नेमकं काय घडलंय, याबाबत आपण सविस्तर जाणून घेवू या.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, मित्राच्या पत्नीला परपुरुषाबरोबर शरीरसंबंध ठेव, तसं नाही केलं तर तुला करंट देऊन मारू, असे म्हणत धमकावणारी पुण्यातील वादग्रस्त महिला पोलीस शिपाई अनघा ढवळे (Anagha Dhavale) आहे. तिला सध्या निलंबित करण्यात आल्याची माहिती मिळतेय. अनघा सुनील ढवळे, असं या महिला पोलीस शिपायाचं नाव आहे. ती कोथरूड वाहतूक पोलीस विभागात कार्यरत होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अनघाला निलंबित करण्यात आलंय.

मित्राच्या बायकोला धमकावलं

अनघा ढवळे हिने तिच्या मित्राच्या पत्नीला तू परपुरुषाबरोबर संबंध ठेव. तू जर असं केलं नाही, तर तुला आणि तुझ्या घरच्या लोकांना ठार मारू. मी पुण्याची लोकल आहे. माझी गुंडांबरोबर ओळख (Female police constable Suspended) आहे. तसंच आम्ही एक सामाजिक सोशल फाउंडेशन चालवतो. या फाउंडेशनच्या माध्यमातून ब्लॅकचे व्हाईट मनी करतो. त्यामध्ये आमचा एक 9 करोडचा व्यवहार झालाय. यात तुझ्या नवऱ्याला ४० ते ५० लाख रुपये मिळणार आहे, अशी धमकी तिने मित्राच्या बायकोला दिली होती.

महिला पोलीस
Maldives Minister Suspend: PM मोदींवर टिप्पणी केल्याबद्दल मालदीवच्या मंत्री निलंबित, मरियमसह तिघांवर कारवाई

महिला पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई

जर तु आमचं ऐकलं नाही, तु असं केलं नाही तर तुला ठारू मारू. तुला करंट देतो, असं म्हणत तिने पीडित महिलेला (Pune News) धमकावलं. या सगळ्या प्रकरणात पीडित महिलेने कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज पोलिसात तक्रार दाखल केली होती. ⁠या तक्रारीवरून आता पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केलीय. याप्रकरणी अनघा ढवळे या महिला पोलीस शिपायावर निलंबनाची कारवाई करण्यात (crime news) आलीय. या घटनेनंतर पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

महिला पोलीस
Pune Tahsildar Suspended: पुण्यातील सासवड EVM चोरी प्रकरणी तहसीलदार सस्पेंड, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com