Maldives Minister Suspend: PM मोदींवर टिप्पणी केल्याबद्दल मालदीवच्या मंत्री निलंबित, मरियमसह तिघांवर कारवाई

Maldives Minister Suspend: मालदीव सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पण्णी केली होती. त्यावरून मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान या मंत्र्यांना निलंबित केलं करण्यात आलं आहे.
Maldives Minister Suspend
Maldives Minister SuspendSaam Digital
Published On

Maldives Minister Suspend

मालदीव सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात आक्षेपार्ह टिप्पण्णी केली होती. त्यावरून मरियम शिउना, मलशा आणि हसन जिहान या मंत्र्यांना निलंबित केलं करण्यात आलं आहे. मालदीव सरकारचे प्रवक्ते मंत्री इब्राहिम उलील यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. मालदीवचे माजी राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद रोलिह यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. मालदीव सरकारच्या मंत्र्यांकडून सोशल मीडियावर भारताविरोधात वापरण्यात आलेल्या द्वेषपूर्ण भाषेचा आपण निषेध करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारत मालदीवचा जवळचा मित्र आहे. या प्रकारच्या टिप्पण्यांमुळे दोन्ही देशांच्या मैत्रिवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो असं त्यांनी म्हटलं आहे.

नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी लक्षद्वीपचा दौरा केला होता. त्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यानंतर मालदीवमधील नव्या सरकारमधील नेत्यांनी यावर वादग्रस्त टिप्पणी केली होती. यावरून दोन्ही देशांमधील वातावरण तापलं असून मालदीव सरकारने यावर अधिकृत भूमिका जाहीर केली आहे. सरकारी पक्षाचे नेते झाहिद रमीझ यांनी भारत पैसे कमवण्यासाठी श्रीलंका आणि आजूबाजूच्या लहान देशांच्या अर्थव्यवस्थेची नक्कल करत असल्याचं म्हटलं होतं.   

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maldives Minister Suspend
Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकांचं भाजपनं रणशिंग फुंकलं? १३ जानेवारीला या राज्यातून PM मोदी फोडणार प्रचाराचा नारळ?

भारतासारखा खंडप्राय देश भारतीय उपखंड आणि लहान द्वीपसमूहातील देशांच्या म्हणजेच श्रीलंका, मालदीव सारख्या देशाच्या पर्यटनाची नक्कल करून नफा करमवण्याचा प्रयत्न करत आहे, ही शोकांतीका आहे. तसेच मोदींच्या लक्षद्वीप दौऱ्यामुळे मालदीवला फटका बसणार असल्याचा दावा करण्यात आला होता.

Maldives Minister Suspend
Winter News Railway Track Shrinking: राजस्थानमध्ये थंडीचा कहर; चुरूमध्ये रेल्वेरुळही आकुंचन पावले, २ इंचाचा आला गॅप

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com