Pune Tahsildar Suspended: पुण्यातील सासवड EVM चोरी प्रकरणी तहसीलदार सस्पेंड, निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

Pune News: पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरी झाले होते. यावरच आता निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे.
Pune Tahsildar Suspended
Pune Tahsildar SuspendedSaam Tv
Published On

Pune Tahsildar Suspended:

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीन चोरी झाले होते. यावरच आता निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाने याप्रकरणी येथील तहसीलदाराला सस्पेंड केलं आहे.

निडवणूक आयोगाने याप्रकरणी एक पत्रक ही जाहीर केलं आहे. यात सांगण्यात आलं आहे की, ''याप्रकरणी आयोगाने संबंधित उपविभागीय अधिकारी, तहसीलदार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांना तात्काळ निलंबित करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.''  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Pune Tahsildar Suspended
Doctors Strike: राज्यातील निवासी डॉक्टरांचं संप मागे; काय होत्या मागण्या अन् अजित पवार यांनी कोणतं आश्वासन दिलं?

यात पुढे सांगण्यात आलं आहे की, ''आयोगाने परिच्छेद 6 (अ) मध्ये समाविष्ट असलेल्या प्रशिक्षण आणि जागरूकता स्ट्राँग रूमच्या सुरक्षा प्रोटोकॉलची खात्री न केल्याबद्दल जिल्हा निवडणूक अधिकारी, पुणे आणि पोलिस अधीक्षक (ग्रामीण), पुणे यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्याचे निर्देश दिले आहेत.'' (Latest Marathi News)

पुरंदर तालुक्यातील सासवड तहसील कार्यालयातून ईव्हीएम मशीनची चोरी झाली होती. यातच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत पुणे ग्रामीण पोलिसांनी अवघ्या 24 तासात 2 चोरट्यांनी या प्रकरणी अटक केली. पोलिसांनी या दोन्ही आरोपींना कंट्रोल युनिटसह जेजुरीमधून अटक केली आहे. नेमकी त्यांनी ही चोरी कशासाठी केली याचा तपास सुरू आहे.

Pune Tahsildar Suspended
Sharad Pawar On Pm Modi: नेहरूंबद्दल पंतप्रधान सभागृहात बोलले, ते योग्य नाही : शरद पवार

आता सासवड शहरातील तहसील कार्यालयातील स्ट्राँग रूममध्ये ईव्हीएम मशीन ठेवण्यात आलेल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवार आणि रविवारी अशी दोन दिवस तहसील कार्यालयास सुट्टी होती. सोमवारी सकाळी आकरा वाजता तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांना स्ट्राँग रूमचं कुलूप तोडण्यात आलेल आढळून आले. या ठिकाणी असलेल्या ईव्हीएम मशीन मधून एक ईव्हीएम मशीन चोरीला गेल्याचं समजताच एकच खळबळ माजली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com