Mumbai News: खळबळजनक! विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबई विमानतळावरील घटना

Mumbai Breaking News: कर्नाटक पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावलेल्या २४ वर्षीय आरोपीने मुंबई विमानतळावर हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Mumbai Airport News: खळबळजनक! कर्नाटक पोलीसांच्या रडारवर असलेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबई विमानतळावरील घटना
Nagpur Crime NewsSaamtv

सचिन गाड, मुंबई|ता. ६ जून २०२४

मुंबईमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटक पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावलेल्या २४ वर्षीय आरोपीने मुंबई विमानतळावर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कर्नाटक पोलिसांनी लूक आऊट नोटीस बजावलेल्या २४ वर्षीय आरोपीने मुंबई विमानतळावर हाताची नस कापून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहम्मद आफ्रिद असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्यावर कर्नाटकमध्ये गुन्हा दाखल आहे.

मोहम्मद आफ्रिद हा दुबईवरून मुंबईला आला असता विमानतळावर त्याला इम्मिग्रेशन अधिकाऱ्यांनी अडवले. त्यानंतर त्याने इम्मिग्रेशन विभागाच्या चौकशी कक्षात धारधार वस्तूने हाताची नस कापून घेतली. या प्रकाराने कक्षात एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी तात्काळ त्याला रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात आफ्रिद विरोधात आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Airport News: खळबळजनक! कर्नाटक पोलीसांच्या रडारवर असलेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबई विमानतळावरील घटना
Maharashtra Weather Forecast: वादळी वारे अन् मुसळधार पावसाचा इशारा; केव्हा आणि कुठे? जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, कर्नाटकातील सिध्दापुरा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या विनयभंगाच्या गुन्ह्यात मोहम्मद आफ्रिद हा आरोपी असून कोडागु जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी त्याच्याविरोधात लुकआऊट नोटीस बजावली होती. लूक आऊट नोटीस असल्याचे समाजताच आफ्रिदला ताब्यात घेण्यात आले होते.

Mumbai Airport News: खळबळजनक! कर्नाटक पोलीसांच्या रडारवर असलेल्या आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न; मुंबई विमानतळावरील घटना
Saamana Editorial: बाबूंचे बोट धरून भाजप आंध्रात घुसला, बाबागिरीचा मुखवटा जनतेनेच ओरबाडला; सामनातून ठाकरे गटाचा मोदींवर निशाणा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com