Pune Crime: सावत्र बापाकडून ४ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार; अश्लील वर्तन करत दिले चाकूचे चटके, पुण्यातील धक्कादायक घटना

4 Year Old Girl Assulted By Father In Pune: पुण्यात एका चार वर्षीय मुलीवर सावत्र बापानेच अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
बापानेच अत्याचार केल्याची घटना
Girl Assulted By Father Saam Tv
Published On

अक्षय बडवे, साम टीव्ही पुणे

पुण्यामधून बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. सावत्र बापानेच मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. चार वर्षाच्या चिमुकलीला चाकूने चटके दिल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अधिक तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे.

सुनील चौहान, असे अटक केलेल्या आरोपीचं नाव (Pune Crime) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ५ ते १४ जून दरम्यान घडली. ४ वर्षीय चिमुरडी अनेक वेळा रडत होती. तिच्या हातावर चटके दिल्याचे वण होते. यावर तिच्या शाळेतील एका शिक्षिकेने तिला विचारलं आणि तिने हा सगळा प्रकार सांगितला. त्यानंतर ही घटना उघडकीस आल्याची माहिती मिळत आहे.

या चिमुरडीची आई आणि आरोपीचे प्रेम संबंध आहेत. ते दोघेही मजूर आहेत. आरोपी या लहान मुलीचे सावत्र वडील आहेत. त्यामुळे सुरवातीला या मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली (crime news) नव्हती. मात्र पोलिसांना आता तिने स्वत:च तक्रार दिली आहे. आरोपी या लहान मुलीशी अश्लील वर्तन करत होता. तसेच अनेक वेळा त्याने चाकू गरम करून तिला चटके सुद्धा दिलेत, असं तक्रारीत म्हटले गेलं (Pune News) आहे.

बापानेच अत्याचार केल्याची घटना
Shahpur Crime News: क्रूर बापानं गाठला कळस! पत्नीसोबत भांडण झाल्याने 8 वर्षीय मुलाची केली निर्दयपणे हत्या

सावत्र बापानेच मुलीवर अत्याचार केल्याची घटना समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या शिक्षिकेने विचारपूस केल्यामुळे ही घटना उघड झाली आहे. आरोपी वारंवार पीडितेचा छळ करत (Girl Assulted By Step Father) होता, त्याने या चिमुकलीला अनेकदा चटके देखील दिले होते. घडलेल्या प्रकारामुळे पीडित मुलगी घाबरून गेली होती. पोलीस आरोपीवर कारवाई करत आहेत.

बापानेच अत्याचार केल्याची घटना
Dombivli Crime News: मित्राला केलेला 'तो' मेसेज आणि पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या; 8 तासात महिलेच्या हत्येचा उलगडा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com