

Realme 16 Pro, Realme 16 Pro+, Realme Pad 3 आणि Realme Buds Air 8 TWS हे स्मार्टफोन भारतात लाँच करण्यात आलेत. वर्षाच्या पहिल्या लाँच इव्हेंटमध्ये रियलमी कंपनीने त्यांच्या स्मार्टफोनची सिरीज रिलीज केलीये. त्याचप्रमाणे बजेट-फ्रेंडली टॅबलेट पॅड 3 देखील लाँच केलाय. Realme 16 Pro या दोन्ही फोनमध्ये 200MP कॅमेरा आणि 7000mAh बॅटरी सारखे सुपर फीचर यामध्ये देण्यात आलेत. दुसरीकडे Pad 3 मध्ये स्लिम डिझाइन आणि दीर्घकाळ चालणारी बॅटरी देण्यात आलीये.
Realme 16 Pro सिरीजमधील दोन्ही फोनमध्ये 6.78 इंचाचा 1.5K रिझोल्यूशन AMOLED डिस्प्ले देण्यात आलाय. दोन्ही फोनमध्ये 144Hz रिफ्रेश रेट आहे. कंपनीने इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देखील यामध्ये दिलाय. Realme 16 Pro+ मध्ये Snapdragon 7 Gen 4 प्रोसेसरही देण्यात आलाय. तर Pro मॉडेलमध्ये MediaTek Dimensity 7300 Max 5 G प्रोसेसर असण्याची अपेक्षा आहे.
Realme 16 Pro सिरीजमधील दोन्ही फोन 8GB/12GB RAM आणि 128GB/256GB स्टोरेजसह लाँच करण्यात आलेत. दोन्ही फोन Android 16 वर चालतात, जे Realme UI 7 आगे. दोन्ही फोनमध्ये Google Gemini AI वर आधारित अनेक AI फीचर्स देण्यात आलेत. हे फोन IP66, IP68, IP69 आणि IP69K वॉटर आणि डस्टप्रूफ रेटिंग आहेत. फोनमध्ये 80W फास्ट वायर्ड चार्जिंगसह शक्तिशाली 7000mAh बॅटरी आहे.
Realme 16 Pro मध्ये मागील बाजूस 200MP चा मुख्य कॅमेरा आणि 8MP चा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आहे. Realme 16 Pro+ मध्ये 200MP चा मुख्य OIS कॅमेरा आणि 50MP चा पोर्ट्रेट टेलिफोटो कॅमेरा आहे. फोनमध्ये 8MP चा फ्रंट कॅमेरा देखील आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी, दोन्ही फोनमध्ये 50MP चा फ्रंट कॅमेरा आहे.
Realme 16 Pro ₹31,999 च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. हा फोन तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यामध्ये 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 256GB. फोनच्या इतर दोन व्हेरिएंटची किंमत ही ₹33,999 आणि ₹36,999 आहे.
यावेळी फोनच्या खरेदीवर ₹3,000 ची बँक ऑफर देण्यात आलीये. उद्यापासून फ्लिपकार्टवर दुपारी 12 वाजता याची विक्री सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन पेबल ग्रे, ऑर्किड पर्पल आणि मास्टर गोल्ड रंगात ग्राहकांना मिळणार आहे.
Realme 16 Pro+ ₹39,999 च्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आला आहे. तो तीन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये देखील उपलब्ध आहे. यामध्ये 8GB RAM + 128GB, 8GB RAM + 256GB आणि 12GB RAM + 256GB. फोनच्या इतर दोन व्हेरिएंटची किंमत ₹41,999 आणि ₹44,999 आहे. त्याच्या खरेदीवर ₹4,000 ची बँक सूट दिली जातेय. हा फोन मास्टर ग्रे, कॅमेर्लिया पिंक आणि मास्टर गोल्ड रंगात उपलब्ध आहे.
Realme Pad 3 मध्ये 11.6-इंचाचा 2.8K डिस्प्ले आहे. यात 12,200mAh ची मोठी बॅटरी आहे आणि फास्ट चार्जिंगची सुविधा आहे. हे MediaTek Dimensity 7300 Max प्रोसेसरवर चालणार आहे. यामध्ये 8GB RAM आणि 256GB पर्यंत स्टोरेज मिळणार आहे. या टॅबलेटमध्ये 8MP चा रियर कॅमेरा आणि 8MP चा सेल्फी कॅमेरा आहे.
Realme Pad 3 च्या 8GB RAM + 128GB WiFi-only व्हेरिएंटची किंमत 26,999 रुपये आहे. त्याच्या 5G व्हेरिएंटची किंमत 29,999 रुपये आहे. त्याच्या 8GB RAM + 256GB 5G व्हेरिएंटची किंमत 31,999 रुपये आहे. या टॅबलेटचा पहिला सेल 16 जानेवारी रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट आणि रियलमी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर होणार आहे. यात 2,999 रुपयांच्या किमतीचा Realme स्मार्ट पेन देखील आहे. हा टॅबलेट स्पेस ग्रे आणि कॅम्पेन गोल्ड रंगांमध्ये मिळणू शकतो. Realme Buds 8 TWS 3,599 रुपयांच्या किमतीत लाँच करण्यात आले असून त्याच्या खरेदीवर 200 रुपयांची सूट मिळेल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.