Samsung Galaxy S26 Ultraचा लूक आला समोर; मार्केट जाम करणाऱ्या फोनची एक अन् एक गोष्टी झाली लीक

Samsung Galaxy S26 Ultra लवकरच भारतासह जागतिक बाजारपेठेत लाँन्च होऊ शकतो. हा प्रीमियम सॅमसंग फोन अलीकडेच अनेक सर्टिफिकेशन साइट्सवर दिसला होता.
Samsung Galaxy S26 Ultra
Samsung Galaxy S26 Ultra spotted in new color options ahead of official launch.saam tv
Published On
Summary
  • Samsung Galaxy S26 Ultra चे नवीन लीक समोर

  • फोनचे कलर ऑप्शन आधीच रिव्हील

  • भारतात लवकरच लॉन्च होण्याची शक्यता

Samsung Galaxy S26 Ultra ची एक नवीन माहिती समोर आली आहे. दक्षिण कोरियन कंपनीचा हा प्रीमियम स्मार्टफोन पुढील महिन्यात लाँन्च होण्याची शक्यता आहे. यात डिझाइन आणि हार्डवेअरमध्ये अपग्रेड असण्याची शक्यता आहे. कंपनी त्यांच्या गॅलेक्सी कार्यक्रमात Samsung Galaxy S26, Galaxy S26+आणि Galaxy S26 Ultra चे अनावरण करण्याची शक्यता आहे. या मालिकेत नंतर Samsung Galaxy S26 Edge आणि गGalaxy S26 FE देखील लाँन्च होण्याची अपेक्षा आहे.

एका टिपस्टरने X वर Samsung Galaxy S26 Ultra ची प्रतिमा पोस्ट केली. त्याने फोनच्या रंग पर्यायांचे स्क्रीनशॉट शेअर केलेत. या सॅमसंग फोनबद्दलची माहिती एका इंडोनेशियन टिपस्टरने इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. सॅमसंग कंपनी हा फ्लॅगशिप फोन चार रंगांच्या पर्यायांमध्ये लाँन्च करू शकते. यात ब्लॅक शॅडो, व्हाइट शॅडो, गॅलेक्टिक ब्लू आणि अल्ट्रा व्हाइट या रंगांचा समावेश असू शकतो. या सॅमसंग फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Elite Gen 5 प्रोसेसर असण्याची अपेक्षा आहे. यात १६ GB पर्यंत रॅम आणि १ टीबी पर्यंत अंतर्गत स्टोरेज असू शकते.

Samsung Galaxy S26 Ultra
Kolhapur–Vaibhavwadi Railway : कोल्हापूर-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गामुळे होणार कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा विकास

सॅमसंग गॅलेक्सी S26 मालिकेतील तिन्ही फोन भारतीय प्रमाणन वेबसाइट BIS वर दिसलेत. यानुसार हे फोन लवकरच भारतासह जागतिक बाजारपेठेत लाँन्च केले जाऊ शकतात. या मालिकेतील मानक मॉडेल BIS वर SM-S942B/DS मॉडेल क्रमांकासह आणि SM-S947B/DS मॉडेल क्रमांकासह प्लस मॉडेल आढळलेत. यापूर्वी गॅलेक्सी Galaxy S26 Ultra अनेक सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर देखील दिसला आहे. भारतात ही मालिका Exynos २६०० प्रोसेसरसह लाँन्च केली जाऊ शकते.

Samsung Galaxy S26 Ultra
Vande Bharat Train: देशातील पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन 'या' मार्गावर धावणार; जाणून घ्या तिकीट दर अन् A1 सुविधा?

सॅमसंगच्या या अल्ट्रा प्रीमियम फोनच्या फीचर म्हणाल तर ते ५०००mAh बॅटरी आणि ६०W वायर्ड चार्जिंगसह लाँन्च केला जाऊ शकतो. हा फोन वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो. अल्ट्रा फोन वायरलेस पॉवर ट्रान्सफर, वाय-फाय ७, ब्लूटूथ, एनएफसी आणि सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी फीचर्सने सुसज्ज असेल. यात मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअप देखील असेन असा दावा, करण्यात येत आहे.

या फोनमध्ये २०० मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, ५० मेगापिक्सेलचा टेलिफोटो लेन्स, १० मेगापिक्सेलचा टेलिफोटो पोर्ट्रेट लेन्स आणि ५० मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. हा कॅमेरा ५x पर्यंत ऑप्टिकल झूमला देखील सपोर्ट करेल. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात १२ मेगापिक्सेल कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com