200MP कॅमेरा असलेल्या Samsung Galaxy S24 Ultra फोनचा भाव उतरला; 45,000 रुपयांनी झाला स्वस्त

Samsung Galaxy S24 Ultra Price : या फोनचा भाव उतरला. तब्बल 45,000 रुपयांनी मोबाईल स्वस्त झाला आहे.
Samsung Galaxy S24 Ultra
Samsung Galaxy S24 Ultra PriceSaam tv
Published On
Summary

Samsung Galaxy S24 Ultra या मोबाईलचा भाव स्वस्त

सॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनची किंमत उतरली

फोनमध्ये २०० एमपी कॅमेरा, १२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज बरंच काही

Samsung Galaxy S24 Ultra या मोबाईलचा भाव स्वस्त झाला आहे. सॅमसंगच्या या फ्लॅगशिप फोनची किंमत हजारो रुपयांनी उतरली आहे. फोन लाँच झालेल्या किंमतीच्या अर्ध्या किंमतीत मिळत आहे. या फोनमध्ये २०० एमपी कॅमेरा, १२ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज सारखे फीचर्स आहेत. मागच्या काही दिवसांत झालेल्या फेस्टिवल सेलदरम्यान या प्रीमियम फोनमध्ये किंमतीत मोठी कपात झाली आहे.

सॅमसंगने हा फोन लाँच केला, त्यावेळी फोनची किंमत ही १,२९,९९९ रुपये इतकी होती. आता फोनच्या किंमतीत कपात झाल्यानंतर या फोनची किंमत ८४,९९९ रुपये इतकी झाली आहे. तुम्ही हा मोबाईल ई-कॉमर्स वेबसाईट Amazon वरून हा फोन तुम्ही खरेदी केल्यास २,५९९ रुपयांची कॅशबॅक मिळेल. तुम्हाला या फोन खरेदीवरून नो-कॉस्ट आणि एक्सचेंज ऑफर देखील मिळेल.

Samsung Galaxy S24 Ultra
Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

Samsung च्या या फोनमध्ये ६.७ इंचचा डायनॅमिक AMOLED डिस्प्ले देखील मिळतो. फोनमध्ये डिस्प्लेचा रिझोल्यूशन 3120 x 1440 पिक्सल आहे. या फोनमध्ये १२०Hz हाय रिफ्रेश रेट सपोर्ट आहे. या फोनमध्ये फ्लॅगशिप Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनला 16 जीबी रॅम आणि १ टीबीपर्यंत स्टोरेज सपोर्ट देण्यात आला आहे.

Samsung Galaxy S24 Ultra
Local Body Election : सांगली, अमरावती महापालिकेच्या आरक्षणाची सोडत जाहीर; कोणता वॉर्ड कुणाचा?

हा फोन Android 14 वर आधारित oneUI वर काम करतो. फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसेच 45W वायर्ड आणि वायरलेस फास्ट चार्जिंगचा सपोर्ट मिळतो. सॅमसंगच्या या फोनमध्ये कनेक्टिविटीचं ड्युअल 5G सिम कार्डचा सपोर्ट देखील मिळतोय. यासहित NFC, WIFI, Bluetooth, S-Pen देखील फिचर्स मिळतात.

Samsung Galaxy S24 Ultra
Kalyan Shil Road Traffic : कल्याण शीळ रोडवर तब्बल २० दिवस मेगा ट्रॅफिक ब्लॉक; पर्यायी रस्ता काय? जाणून घ्या

फोनच्या मागे क्वाड कॅमेरा सेटअप देखील मिळतो. फोनमध्ये 200MP मेन कॅमेरा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त Samsung s24 Ultra मध्ये 50MP 12MP आणि 10MP असे तीन कॅमेरा देण्यात आले आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP कॅमेरा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com