RailOne App: रेल्वे तिकीट बुकिंगवर ३ टक्के डिस्काउंट; RailOne अ‍ॅपवर अशी करा प्रोसेस

Indian Railway Railone App: रेल्वेने एक नवीन रेलवन अॅप लाँच केले आहे. या अॅपद्वारे तुम्ही तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला ३ टक्के डिस्काउंट मिळणार आहे.
RailOne App
RailOne AppSaam tv
Published On
Summary

रेल्वेचे नवीन RailOne अॅप लाँच

नवीन अॅपवरुन तिकिट बुक केल्यास ३ टक्के डिस्काउंट

डिजिटल पेमेंट वाढवण्यावर भर

रेल्वेने प्रवाशांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता रेल्वेने डिजिटल पद्धतीने तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांना ऑनलाइन तिकीट बुक करताना ३ टक्क्यांची सूट मिळणार आहे. तुम्ही जर रेलवन या अॅपवरुन तिकीट बुक करत असाल तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे.

RailOne App
High Speed Rail : १९ तासांचा प्रवास फक्त २ तासात, हाय-स्पीड ट्रेनचा मास्टरप्लान नेमका काय?

UTS अॅपद्वारे मासिक पास बंद

रेल्वेने अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यूटीएस अॅपद्वारे आता रेल्वेचा मासिक पास काढणे बंद झाले आहेत. त्यानंतर आता तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी रेलवन या अॅपवर ही सूट देण्यात आली आहे. जेणेकरुन अनेक प्रवासी रेलवन अॅपद्वारे यूपीआय, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगद्वारे पेमेंट करतील.

रेलवनची ही नवीन सिस्टीम १४ जानेवारीपासून सुरु होणार आहे. ही सुविधा प्रायोगिक तत्वावर सुरु केली आहे. ही सुविधा १४ जुलैपर्यंत असणार आहेत. त्यामुळे १४ जुलैपर्यंत तुम्हाला या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. जर ही योजना यशस्वी जाली तर ही सुविधा पुढे सुरु ठेवली जाईल.

रेलवन या अॅपद्वारे तुम्ही रेल्वे वॉलेटद्वारे तिकीट बुक करु शकतात. सध्या फक्त अनारक्षित तिकीट बुकिंगवर ही सुविधा मिळत आहे. यानंतर पुढे भविष्यात इतर तिकिटांवरदेखील सूट देण्याचा विचार सुरु आहे. जर तुम्ही या नवीन सिस्टीमद्वारे ऑनलाइन पेमेंट केले तर तुम्हाला थेट ३ रुपयांचा डिस्काउंट मिळणार आहे.

RailOne App
Kolhapur–Vaibhavwadi Railway : कोल्हापूर-सिंधुदुर्ग प्रवास अवघ्या एका तासात; कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गामुळे होणार कोकण-पश्चिम महाराष्ट्राचा विकास

रेल्वेचे उद्दिष्ट

रेल्वेचा प्रवास खूप सोपा व्हावा. प्रवाशांना तिकीट काढण्यासाठी कोणतीही अडचण येऊ शकते. तसेच डिजिटल पद्धतीने तिकीट काढण्यासाठी प्रवाशांना प्रोत्साहन देण्यासाठी ही सुविधा सुरु केली आहे. जेणेकरुन जास्तीत जास्त प्रवास रेलवन अॅपवर शिफ्ट होतील.

RailOne App
Indian Railway: रेल्वे पास UTS वरून Railone अ‍ॅपवर कसा ट्रान्सफर करायचा?, फॉलो करा सोपी स्टेप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com