

eSakal : मराठी बातम्यांच्या डिजीटल विश्वात पुन्हा एकदा esakal ने बाजी मारली आहे. लाखो वाचकांचा विश्वास आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेल्या बातम्यांच्या जोरावर eSakal.com ने मराठी डिजिटल न्यूजमध्ये नंबर १ स्थान कायम राखलं आहे. Comscore MMX Multi-Platform 2026 च्या ताज्या आकडेवारीनुसार eSakalला ७.४ कोटींहून जास्त Total Unique Visitors/Viewers मिळाले आहेत.
Comscore च्या ताज्या आकडेवारीत eSakalने मराठी डिजिटल न्यूज प्लॅटफॉर्ममध्ये सर्वात जास्त प्रेक्षकसंख्या नोंदवली आहे. त्यामुळे डिजिटल माध्यामातील eSakalची आघाडी पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. या क्रमवारीत लोकमतला ६.४ कोटी, News18 मराठीला ३.३ कोटी, Zee News मराठीला २.४ कोटी, तर ABP Live Marathi - ABP Majhaला १.६ कोटी Total Unique Visitors/Viewers मिळाले आहेत.
eSakalला मिळालेली ७.४ कोटींपेक्षा जास्त प्रेक्षकसंख्या हा डिजिटल क्षेत्रातला महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. पहिल्या क्रमांकावरील eSakal आणि दुसऱ्या क्रमांकावरील प्लॅटफॉर्मच्या आकडेवारीतही मोठं अंतर आहे.
महाराष्ट्रातल्या गावापासून शहरापर्यंतच्या बातम्या वाचकांपर्यंत पोहोचण्यावर eSakalचा भर राहिला आहे. स्थानिक आणि हायपरलोकल बातम्यांसोबतच ब्रेकिंग न्यूज, व्हिडिओ, विशेष स्टोरीज आणि विश्लेषण यामुळे डिजिटल वाचकांशी जोडलेपण मजबूत झाले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागातल्या घडामोडी डिजिटल माध्यमातून वेगाने वाचकांपर्यंत पोहोचण्याचे काम eSakal सातत्याने करत आहे. ComScoreच्या विविध अहवालांमध्ये eSakalने मराठी डिजिटल न्यूज क्षेत्रात आपले आघाडीचे स्थान कायम ठेवले आहे. ताज्या आकडेवारीत पु्न्हा एकदा ७.४ कोटींहून जास्त Total Unique Visitors/Viewers मिळवत eSakalने आपली मजबूत डिजिटल पोहोच अधोरेखित केली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.