WhatsApp New Feature: WhatsApp युजर्ससाठी खूशखबर! आले भन्नाट फीचर, आता 'या' ट्रिक्सने स्केड्यूल करा मेसेजेस, कसं वापरायचं?

WhatsApp Update 2026: WhatsApp युजर्ससाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आता WhatsApp मध्ये काही फायदेशीर फिचर्स आलेले आहेत.
WhatsApp New Feature
WhatsApp New Featuresaam tv
Published On: 

तुम्ही WhatsApp युजर्स असाल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. आता WhatsApp एक नवं फीचर आणण्याच्या तयारीत आहे. या फीचरमुळे यूजर्सना मेसेज, फोटो आणि व्हिडिओ ठरावीक वेळेसाठी शेड्यूल करता येणार आहेत. त्यामुळे एखाद्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील किंवा महत्त्वाची माहिती पाठवायची असेल, तर त्यासाठी ठरलेल्या वेळी ऑनलाइन राहण्याची गरज भासणार नाही. शेड्यूल केलेला मेसेज निवडलेल्या वेळी आपोआप पाठवला जाऊ शकतो.

मिडिया रिपोर्टनुसार, WhatsApp सध्या या फीचरची काही अँड्रॉइड बीटा यूझर्ससाठी चाचणी करत आहे. WABetaInfo च्या अहवालानुसार, WhatsApp च्या अँड्रॉइड बीटा व्हर्जन 2.26.40.7 वापरणाऱ्या काही यूझर्सना ही सुविधा उपलब्ध झाली आहे. मात्र, हे फीचर सर्व यूजर्ससाठी कधी सुरू होणार याची अधिकृत तारीख अद्याप जाहीर केलेली नाही.

WhatsApp New Feature
Chanakya Niti: चाणक्यांच्या या ६ सवयी करा फॉलो अन् व्हा मालामाल

मेसेज शेड्यूल करण्याची प्रोसेस

तुम्ही हे फीचर अगदी सोप्या पद्धतीने वापरू शकता. यूजर्सना संबंधित चॅटमध्ये जाऊन मेसेज टाइप करावा लागेल. मग 'Send' बटण काही वेळ दाबून ठेवल्याने तारीख आणि वेळ निवडण्याचा ऑप्शन दिसेल. वेळ सेट केली की मेसेज शेड्यल होईल आणि ठरलेल्या वेळी पाठवला जाईल.

फोटो आणि व्हिडिओ शेड्यूल होणार का?

WhatsApp च्या या फीचरमध्ये फक्त टेक्स्ट मेसेजच नाही, तर लिंक, फोटो आणि व्हिडिओही शेड्यूल करता येऊ शकतील. रिपोर्टनुसार, एका वेळी एक फोटो किंवा व्हिडिओ शेड्यूल करण्याचा पर्याय मिळू शकतो. फोटो पाठवण्याआधी त्यात आवश्यक बदल करता येतील.तसेच कॅप्शन जोडण्याची सुविधाही उपलब्ध होईल.

WhatsApp New Feature
Walking Backward Benefits: गुडघेदुखीपासून मिळेल आराम? उलटे चालण्याचे फायदे जाणून थक्क व्हाल

१० मिनिटांपासून दोन आठवड्यापर्यंत वेळ निवडण्याचा ऑप्शन

रिपोर्टनुसार, युजर्सना मेसेज किमान १० मिनिटांनंतर किंवा जास्तीत जास्त दोन आठवड्यांपर्यंत पाठवण्यासाठी शेड्यूल करता येऊ शकतो. विशेष म्हणजे, मेसेज पाठवण्यासाठी ठरलेल्या वेळी अॅप उघडं ठेवण्याची किंवा फोन ऑनलाइन असण्याची गरज भासणार नाही, असा दावा केला जात आहे.

ग्रुप चॅटमध्येही मिळू शकते सुविधा

ही सुविधा वैयक्तिक चॅटसोबतच ग्रुप चॅटमध्येही उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र मेसेज शेड्यूल करताना ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांनाच तो मिळू शकतो. त्यानंतर ग्रुपमध्ये सहभागी होणाऱ्या नवीन सदस्यांना आधीचे शेड्यूल केलेले मेसेज मिळणार नाहीत, असं रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.

शेड्यूल केलेला मेसेज डिलिटही करता येणार

युजर्सना चॅटच्या माहितीत विभागात शेड्यूल केलेले मेसेज पाहता येतील आणि पाठवण्याआधी ते डिलिटही करता येतील. मेसेज डिलिट केल्यावर समोरच्या व्यक्तीला त्याचे नॉटिफिकेशन जाणार नाही, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. सध्या हे फीचर चाचणीच्या टप्प्यात असून, सर्वसामान्य यूजर्ससाठी ते कधी उपलब्ध होणार, याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com