Volvo EX90: एका सेकंदात १०० किमीचा स्पीड, एका चार्जमध्ये ७२५ किमीची रेंज; Volvoची दमदार कार लॉन्च

Volvo Unveils EX90 Electric SUV : व्हॉल्व्हो EX90 इलेक्ट्रिक एसयूव्ही भारतात १.२६ कोटी रुपयांच्या सुरुवातीच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च झाली आहे. जाणून घ्या या लक्झरी कारची रेंज, फीचर्स, बॅटरी आणि आधुनिक तंत्रज्ञान.
Volvo EX90 launch price in India 2026
Volvo EX90 launch price in India 2026
Published On: 

व्हॉल्व्हो कार इंडियाने इलेक्ट्रिक लक्झरी एसयूव्ही Volvo EX90 भारतीय बाजारात लाँन्च केलीय. भारतीय ऑटोमोबाईल बाजारात व्हॉल्व्होचे हे पहिलेच 'सॉफ्टवेअर-डिफाइंड व्हेईकल' आहे. कंपनीच्या नवीन SPA2 प्लॅटफॉर्मवर हे तयार करण्यात आले आहे. या लाँचिंगसोबतच कंपनीने आपल्या आगामी लक्झरी सर्व-इलेक्ट्रिक सेडान ES90 ची अधिकृत पहिली झलकही दाखवलीय. या अत्याधुनिक ६-सीटर फॅमिली एसयूव्हीची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत १.२६ कोटी रुपये ठेवण्यात आलीय.

व्हॉल्व्होच्या तंत्रज्ञानाने समृद्ध वाहन म्हणून EX90 ची ओळख आहे. यात NVIDIA DRIVE प्लॅटफॉर्म आणि Qualcomm Snapdragon 8155 कॉकपिट तंत्रज्ञान वापरण्यात आलंय. एकाच सिंगल कोअर कॉम्प्युटरद्वारे हे वाहन प्रति सेकंद २५४ ते २८० ट्रिलियन ऑपरेशन्स हाताळू शकते. यात १४.५ इंचाची टचस्क्रीन देण्यात आलीय. बिल्ट-इन गुगल इकोसिस्टम (गुगल मॅप्स, यूट्यूब, ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ), वायरलेस ॲपल कारप्ले आणि वारंवार ओव्हर-द-एअर सॉफ्टवेअर अपडेट्स मिळतात.

Volvo EX90 launch price in India 2026
Car starting tips: सकाळी सकाळी कार स्टार्ट केल्यानंतर ही 1 चूक करणं पडेल महागात

बॅटरी, दमदार परफॉर्मन्स आणि रेंज

या कारमध्ये हाय-व्होल्टेज १०६ kWh क्षमतेची लिथियम-आयन बॅटरी आणि प्रगत ट्विन-मोटर सेटअप देण्यात आलाय. हे इंजिन ३३५ kW (४५६ hp) पॉवर आणि ६७० Nm टॉर्क निर्माण करते. अवघ्या ५.५ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग पकडण्याची क्षमता यात आहे. WLTP मानकांनुसार ही गाडी एका चार्जवर ६२५ किमी आणि ICAT नुसार तब्बल ७२५ किमी पर्यंतची ड्रायव्हिंग रेंज देते.

Volvo EX90 launch price in India 2026
Car on 20000 salary: दरमहा 20 हजार रुपये पगार असेल तर कोणती कार घेण्याचा विचार कराल?

डॉन रंगातील व्हेंटिलेटेड नॅपपा लेदर सीट्स, बॅक-लिट लाकडी फिनिशिंग, ४-झोन क्लायमेट कंट्रोल आणि विशाल पॅनोरामिक इलेक्ट्रोक्रोमिक सनरुफ देण्यात आलंय. ६-सीटर कॅप्टन सीट लेआउटमुळे तिसऱ्या रांगेत जाणे सोपे होते, तसेच बूट स्पेस वाढवण्यासाठी पॉवर-फोल्डिंग रिअर सीट्सची सुविधा आहे. यामध्ये १६१०W क्षमतेची, २५-स्पीकर्स असलेली बोवर्स अँड विल्किन्स हाय-फिडेलिटी साऊंड सिस्टीम डॉल्बी ॲटमॉस आणि ॲबे रोड स्टुडिओ मोड्ससह येत असते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com