Surabhi Jayashree Jagdish
सकाळी कार सुरू करताना केलेली एक छोटीशी चूक इंजिनसाठी त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे गाडी सुरू केल्यानंतर लगेच वेग वाढवण्याची घाई करू नका. इंजिनला सुरुवातीला व्यवस्थित काम करू देणं महत्त्वाचं आहे.
अनेकजण सकाळी वेळ कमी असल्यामुळे कार सुरू करताच लगेच गाडी चालवायला सुरुवात करतात. मात्र असं करणं टाळायला हवं. गाडी सुरू केल्यानंतर काही सेकंद थांबून मग हळूहळू पुढे जाणं योग्य ठरतं.
कार सुरू केल्यानंतर लगेच वेगाने गाडी चालवल्यास इंजिनच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. याचा परिणाम गाडीच्या मायलेजवरही होण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी कार सुरू करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
कार स्टार्ट केल्यानंतर लगेच ॲक्सिलरेटर जोरात दाबणं टाळा. सुरुवातीलाच इंजिनवर जास्त ताण येईल अशा पद्धतीने गाडी चालवू नका. त्याऐवजी गाडी हळूहळू पुढे न्या.
इंजिन सुरू झाल्यानंतर इंजिन ऑईल सर्व आवश्यक भागांपर्यंत पोहोचण्यासाठी काही सेकंद लागतात. हे ऑईल इंजिनमधील वेगवेगळ्या भागांमधील घर्षण कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे कार सुरू केल्यानंतर लगेच इंजिनवर जास्त ताण देणं टाळावं.
कार सुरू केल्यानंतर साधारण २० ते ३० सेकंद इंजिनला सामान्य गतीने चालू राहू द्या. या वेळेत इंजिन सुरू झालं आहे का आणि डॅशबोर्डवर कोणतीही इशारा देणारी लाइट दिसत आहे का, हे तपासा. त्यानंतर गाडी हळूहळू चालवायला सुरुवात करा.
कार सुरू केल्यानंतर इंजिन व्यवस्थित चालत असल्याची खात्री करा आणि मग हळूहळू गाडी पुढे न्या. सुरुवातीला अचानक वेग वाढवणं किंवा जोरात ॲक्सिलरेटर दाबणं टाळा. सकाळी घेतलेली ही छोटीशी काळजी इंजिनची देखभाल करण्यास आणि गाडी चांगल्या स्थितीत ठेवण्यास मदत करू शकते.