Tyre expiry date: वाहनांच्या टायरची एक्सपायरी डेट काय असते? जाणून घ्या

Surabhi Jayashree Jagdish

टायरची एक्सपायरी डेट

टायरवर साधारणपणे ठरावीक एक्सपायरी डेट लिहिलेली नसते. मात्र प्रत्येक टायरचे एक ठरावीक आयुष्य असतं. त्यामुळे टायर फक्त एक्सपायरी डेट नाही म्हणून कितीही वर्षे वापरू नये.

tyre age | saam tv

ट्रेड पाहून टायर चांगला आहे असं समजू नका

अनेक लोक टायरचे ट्रेड पूर्ण घासले की तो बदलावा असं म्हणतात. पण टायरची सुरक्षितता फक्त ट्रेड किती उरला आहे यावर ठरत नाही. टायर जुना झाल्यास रबरमध्ये बदल होऊन तो खराब होऊ शकतो

DOT tyre code | saam tv

टायरची वेळोवेळी तपासणी

गाडी चालवताना टायरची अवस्था चांगली असणे खूप महत्त्वाचे आहे. टायरमध्ये भेगा, फुगवटा किंवा इतर नुकसान दिसत आहे का, हे तपासावे. टायर खराब किंवा खूप जुना वाटत असेल तर तो वेळेत बदलणे सुरक्षित ठरते.

car tyre safety | saam tv

कमी वापरलेला टायर

टायरचा वापर कमी झाला तरी तो काळानुसार जुना होत जातो. कारण टायरच्या रबरवर फक्त गाडी चालवल्याचा नाही तर वेळेचाही परिणाम होतो. त्यामुळे गाडी जास्त चालत नसली तरी टायर किती जुना आहे हे तपासणं गरजेचं आहे.

tyre manufacturing date | saam tv

कमी वापरलेला टायरही जुना होतो

टायरचा वापर कमी झाला तरी तो काळानुसार जुना होत जातो. कारण टायरच्या रबरवर फक्त गाडी चालवल्याचा नाही तर वेळेचाही परिणाम होतो. त्यामुळे गाडी जास्त चालत नसली तरी टायर किती जुना आहे हे तपासणं गरजेचं आहे.

old tyre problems | saam tv

टायर किती जुना आहे हे कसं ओळखाल?

टायर किती जुनं आहे हे पाहण्यासाठी त्यावरील DOT कोड तपासा. DOT कोडच्या शेवटचे चार अंक टायर कोणत्या आठवड्यात आणि कोणत्या वर्षी तयार झाला, हे सांगतात. जसं की, 2524 असे अंक असतील तर टायर 2024 च्या 25व्या आठवड्यात तयार झाला होता.

tyre damage | saam tv

CNG bike: CNG बाईकची रेंज किती? 2 किलो CNGमध्ये जाणून घ्या किती किमी धावते?

CNG fuel economy | saam tv
येथे क्लिक करा