Vivo Y18i: 5000mAh बॅटरी अन् जबरदस्त कॅमेरासह Vivo Y18i लाँच; किंमत फक्त ७९९९ रुपये;जाणून घ्या सविस्तर

Vivo Y18i Smartphone Launch: विवो कंपनीने नुकताच एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने Vivo Y18i हा स्मार्टफोन 5000mAh बॅटरी अन् ड्युअल कॅमेरासह लाँच केला आहे.
Vivo Y18i
Vivo Y18iGoogle
Published On

विवो ही भारतातील स्मार्टफोनमधील लोकप्रिय कंपनी आहे. कंपनी नेहमीच आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन स्मार्टफोन लाँच करत असते. ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन बजेटमध्ये उत्तम फिचर्स असलेला स्मार्टफोन लाँच करण्यावर कंपनीचा भर असतो. कंपनीचा नुकताच काही दिवसांपूर्वी Vivo Y18i लाँच केला आहे.

Vivo Y18i
60 kmpl मायलेज, किंमत 80,000 पेक्षा कमी; मध्यमवर्गीयांसाठी बेस्ट आहे Honda ची ही बाईक

Vivo Y18 आणि Vivo Y18e नंतर हा स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये तुम्हाला जबरदस्त फिचर्स मिळणार आहेत.कंपनीचा हा स्मार्टफोन Unisoc Tiger T612 प्रोसेसरसह येतो. यात HD प्लस डिस्प्ले येतो. त्याचसोबत 5000mAh बॅटरी मिळते.हा स्मार्टफोन एकाच कॉन्फिगरेशनसह लाँच करण्यात आला आहे.

Vivo Y18i हा स्मार्टफोन सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला परवडेल अशा किंमतीत लाँच झाला आहे. कंपनीने हा स्मार्टफोन 4GB RAM आणि 64GB स्टोरेजसह लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत ७,९९९ आहे. हा स्मार्टफोन ऑफलाइन मार्केटमध्ये उपलब्ध आहे.

Vivo Y18i या स्मार्टफोनमध्ये 6.56 इंचचा HD+LCD डिस्प्ले मिळतो. हा डिस्प्ले 528 Nits पीक ब्राइटनेससह येतो. स्मार्टफोन वॉटरड्रॉप नॉचसह येतो. त्यात Unisoc Tiger T612 प्रोसेसर वापरण्यात आला आहे.

Vivo Y18i
Electric Shock Safety: पावसात विजेचा झटका लागू नये यासाठी काय करावे? विद्युत सुरक्षेसाठी वीज कंपन्याचा काय आहे सल्ला?

हा हँडसेट Android 14 बेस्ड FunTouch OS सह येतो. यात 13MP मेन लेन्स देण्यात आली आहे. ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप या फोनमध्ये देण्यात आला आहे.0.08MP सेकंडरी लेन्स देण्यात आली आहे. तर 5MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

Vivo Y18i
Stock Market: कटिंग चहाच्या पैशात व्हा लखपती; सात रुपयाच्या शेअरने केलं मालामाल, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com