भारतीय दुचाकी बाजारात 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या बाईकला मोठी मागणी आहे. या सेगमेंटमध्ये 100cc इंजिन पॉवरट्रेनसह हाय मायलेज बाईक अनेक कंपन्या ऑफर करत आहेत. Honda Livo ही यातीलच एक बाईक आहे. या बाईकचे वजन 113 किलोग्रॅम आहे, ज्यामुळे रस्त्यावर फास्ट स्पीडमध्येही बाईक नियंत्रण करणे सोपे होते. याच बाईकच्या फीचर्स आणि किंमतीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ...
या बाईकमध्ये 109.51 cc चे पॉवरफुल इंजिन आहे. जबरदस्त मायलेज देणारी ही बाईक 8.6 bhp पॉवर आणि 9.3 Nm टॉर्क जनरेट करते. कंपनीचा दावा आहे की, ही बाईक 60 kmpl जास्त मायलेज देते. ही बाईक 79950 रुपये एक्स-शोरूमच्या प्रारंभिक किमतीत विक्रीसाठी उपलब्ध आहे. बाईकच्या टॉप मॉडेलची किंमत 1.03 लाख रुपये आहे. होंडाच्या या नवीन जनरेशन बाईकमध्ये डिजिटल कन्सोल आहे.
सेफ्टीसाठी Honda Livo मध्ये ड्रम ब्रेक आणि Combined braking system आहे. ही सिस्टीम दोन्ही टायर नियंत्रित करण्यात मदत करते. ही बाईक अलॉय व्हीलसह येते, ज्यामुळे ही बाईक अधिक स्टायलिश दिसते. बाईकची सीटची उंची 790 मिमी आहे, ज्यामुळे कमी उंची असलेले लोक देखील ही बाईक आरामात चालवू शकतात.
ही बाईक आरामदायी राइडसाठी सिंगल पीस सीटसह येते. यात हाय स्पीडसाठी 4 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आहे. या बाईकची टॉप स्पीड 110 किमी/ताशी आहे. बाईकमध्ये 9 लीटरची इंधन टाकी आहे. ज्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात ती चालवताना कोणतीही अडचण येत नाही. ही बाईक दोन प्रकारात उपलब्ध आहे.
Honda Livo मध्ये ड्रम आणि डिस्क ब्रेक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. बाईकमध्ये ट्यूबलेस टायर आणि 18 इंच टायर साइज आहे. ही बाईक हिरो पॅशन आणि TVS व्हिक्टरशी टक्कर देते, जे या सेगमेंटमध्ये आधीच बाजारात उपलब्ध आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.