

2026 मध्ये सहा मोठ्या कंपन्यांकडून नवी मिड-साइज SUV भारतीय बाजारात दाखल होणार आहेत.
इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि टर्बो पेट्रोल इंजिनचे पर्याय उपलब्ध राहतील.
ADAS, पॅनोरमिक सनरूफ, मोठे डायमेंशन्स आणि प्रीमियम फीचर्स या SUV मध्ये मिळतील.
मारुतीची e-Vitara 500 किमी रेंजसह तर होंडा Elevate Hybrid सर्वाधिक मायलेजसह बाजारात उतरणार आहे.
सध्या अनेकांना धक्काधक्कीच्या जीवनशैलीत प्रवास करणं अत्यंत कंटाळवाणं झालं आहे. त्यातच वर्ष संपायला अवघा १ महिना राहीला आहे. याच मुहूर्तावर जर तुम्ही नवीन कार विकत घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी फीचर्स फुल्ल आणि कमाल स्टाईलीच्या कार मार्केटमध्ये येणार आहेत. पुढे आपण नवी मिड-साइज SUV च्या गाड्यांची खासियत जाणून घेणार आहोत. मारुती, किआ, रेनॉल्ट, स्कोडा, फॉक्सवैगन आणि होंडा या कंपन्या 2026 पर्यंत आपापल्या नव्या SUV भारतीय बाजारात आणणार आहेत.
मारुती सुझुकी कंपनी आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक SUV e-Vitara ला 2 डिसेंबर रोजी लाँच करणार आहे. गुजरातमधील हंसलपूर प्लांटमध्ये तयार होणारी ही EV दोन बॅटरींसोबत उपलब्ध होणार आहे. 49 kWh आणि 61 kWh असेल. मोठी बॅटरी एका चार्जवर तब्बल 500 किमी रेंज देईल, असा दावा कंपनीने केला आहे.
कंपनीच्या लोकप्रिय किआ सेल्टोस हायब्रिडचा नेक्स्ट-जनरेशन अवतार या महिन्यात ग्लोबली डेब्यू करणार आहे. 10 डिसेंबरला त्याची पहिली झलक समोर येणार आहे. भारतात ही कार लाँच 2026 मध्ये होण्याची शक्यता आहे. नवीन सेल्टोस पूर्णपणे नवीन डिझाइन, मोठे डायमेंशन्स आणि बरीच अॅडव्हान्स फीचर्स घेऊन येईल. भारतीय मार्केटमध्ये विद्यमान 1.5 NA पेट्रोल, 1.5 टर्बो पेट्रोल आणि 1.5 डिझेल इंजिन्स कायम राहतील.
रेनॉल्टची दमदार SUV Duster 26 जानेवारी 2026 रोजी भारतात नवीन अवतारात लॉंच होणार आहे. नवीन CMF-B प्लॅटफॉर्मवर आधारित ही SUV 1.3-लिटर टर्बो पेट्रोल इंजिनसह येऊ शकते. आंतरराष्ट्रीय मॉडेलसारखाच तिचा डिझाइन असणार असून भारतीय बाजारासाठी काही खास ट्युनिंगदेखील केली जाईल.
स्कोडा आणि फॉक्सवैगनही 2025–26 मध्ये मोठे अपडेट घेऊन येत आहेत. स्कोडा कुशाक आणि फॉक्सवैगन टाइगुन या दोन्ही SUV मध्ये नवीन फ्रंट प्रोफाइल, नवीन अलॉय व्हील्स, पॅनोरमिक सनरूफ, 360 सेल्सियस कॅमेरा आणि ADAS लेव्हल-2 यांसारखे प्रीमियम फीचर्स मिळण्याची अपेक्षा आहे.
होंडादेखील त्यांची लोकप्रिय SUV Elevate हायब्रिड अवतारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. यात सिटी e:HEV प्रमाणे 1.5-लिटर Atkinson-cycle पेट्रोल इंजिन आणि दोन इलेक्ट्रिक मोटर्सचा समावेश असेल. हायब्रिड सेटअपमुळे 26–27 kmpl पर्यंतची मायलेज मिळू शकते, ज्यामुळे ही SUV सेगमेंटमधील सर्वाधिक फ्यूल-इफिशिएंट मॉडेल ठरू शकते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.