Sakshi Sunil Jadhav
पुण्यातल्या हिवाळी वातावरणात छोट्या ट्रेकची मजा काही वेगळीच असते. त्यातच शहराजवळ शांत, निसर्गरम्य ठिकाण शोधत असाल, तर बावधन परिसरातील टेकड्या सध्या पुणेकरांचे आवडते वीकेंड स्पॉट ठरत आहेत.
बावधनपासून काही मिनिटांच्या अंतरावर तुम्ही बावधन टेकडीच्या पायथ्यापर्यंत पोहोचता येत असल्याने हे ठिकाण वीकेंडसाठी बेस्ट स्पॉट आहे.
डिसेंबर–जानेवारीत टेकडीवर जाण्याचा ताजेतवाना अनुभव पुणेकरांना खूप आवडतो. त्यामुळे इथे पर्यटकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
पहाटे टेकडीवरून दिसणारा सूर्योदय फोटोप्रेमींसाठी खास आकर्षण आहे. कठीण चढ नाही. कुटुंबासोबत, मुलांसह सहज करता येणारा हा छोटा ट्रेक आहे.
हिरवी झाडी, शांत वातावरण आणि स्वच्छ हवा निसर्गप्रेमींसाठी परफेक्ट जागा आहे. धावपळीच्या जगातून एक दिवस तुम्ही इथे निवांत राहू शकता.
अनेक जण या टेकडीवर रोज सकाळी वर्कआउट, जॉगिंग आणि हायकिंगसाठी येतात. शहराच्या गजबजाटापासून दूर, शांततेचा अनुभव घेण्यासाठीत उत्तम पर्याय आहे.
मॉन्सूनमध्ये हिरवागार होणारा परिसर हिवाळ्यात अजूनही आकर्षक दिसतो. तसेच हिवाळ्यात तुम्हाला इथे सकाळचे सुंदर दृश्य पाहायला मिळेल.
सुंदर व्ह्यू, ट्रेल्स आणि नैसर्गिक पार्श्वभूमी फोटो-व्हिडिओंसाठी हे परफेक्ट स्पॉट आहे.