Sakshi Sunil Jadhav
आपल्यापैकी अनेक घरांमध्ये उरलेले अन्न पुन्हा गरम करून खाण्याची सवय असते. वेळ वाचवण्यासाठी किंवा अन्न वाया जाऊ नये म्हणून हा उपाय केला जातो.
तुम्हाला माहितीये का? काही भाज्या आणि पदार्थ पुन्हा गरम केल्यास ते शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यातील नैसर्गिक घटक बदलून ते विषारी स्वरूप घेऊ शकतात, ज्यामुळे पोटदुखी, उलट्या, जुलाब आणि फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो.
हिरव्या पालेभाज्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असते. या भाज्या पुन्हा गरम केल्यास नायट्राइट नावाचे हानिकारक संयुग तयार होते. यामुळे उलट्या, पोटदुखी, डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो.
बटाट्यात स्टार्च जास्त प्रमाणात असते. पुन्हा गरम केल्यावर त्याची रासायनिक रचना बदलते आणि अन्नात जंतू वाढू शकतात. हे फूड पॉयझनिंगसाठी सर्वाधिक जबाबदार ठरते.
अंड्यातील प्रथिने पुन्हा गरम केल्यावर खराब होतात. यामुळे पोटाचे आजार, उलट्या-जुलाबाचा धोका वाढतो. एग करी किंवा भुर्जी नेहमी ताजी खावी.
फ्रिजमध्ये ठेवलेल्या पालेभाज्या पुन्हा शिजवल्या किंवा गरम केल्यास त्यातील नायट्रेट हानिकारक स्वरूप धारण करते. आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.
भात जास्त वेळ बाहेर ठेवल्यास त्यात जंतू वाढतात. फ्रिजमध्ये ठेवल्यावरही ते पूर्णपणे नष्ट होत नाहीत. असा भात पुन्हा गरम करून खाल्ल्यास उलट्या-जुलाब होऊ शकतात.
डाळ जास्त वेळ ठेवली किंवा वारंवार गरम केली तर त्यातील प्रथिने आणि पोषकद्रव्ये नष्ट होतात. त्यामुळे पोटाचे विकार निर्माण होऊ शकतात.
कापलेली फळे व सॅलडमध्ये जीवाणू अतिशय वेगाने वाढतात. बराच वेळ ठेवून पुन्हा खाल्ल्यास फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो.