Sakshi Sunil Jadhav
सध्याच्या चुकीच्या जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे तरुण मुला-मुलींमध्ये केस पांढरे होण्याच्या समस्या वाढल्या आहेत.
मुळात केस पांढरे होणे ही नैसर्गिक समस्या आहे. मात्र तुमचे वय जास्त असेल तरच. मात्र या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. याचे नेमके कारण आपण शोधले पाहिजे.
अनेक जण महागडे केमिकलयुक्त हेअर प्रॉडक्ट्स वापरतात. पण त्यांचा परिणाम तितका टिकत नाही. पण आजीबाई सांगत असलेल्या काही पारंपारिक घरगुती उपायांनी केस नैसर्गिकरीत्या काळेभोर, मऊ आणि चमकदार होऊ शकतात.
कांद्याचा रस स्काल्पवर लावल्याने मेलानिनचे उत्पादन वाढते. हे केस काळे करण्यास मदत करते.
कढीपत्ता तिळाच्या तेलात उकळून लावल्यास पांढऱ्या केसांचा रंग हळूहळू काळा होऊ लागतो. हा उपाय आजीबाई खास सुचवतात.
आवळ्यात व्हिटॅमिन C आणि अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. नियमित वापर केल्यास केस काळेभोर आणि मजबूत बनतात.
मेथी दाणे तेलात भिजवून ते केसांवर लावल्याने पांढरे केस कमी होतात आणि केसांची वाढ व्हायला सुरुवात होते.
भृंगराज तेलाला केसांचा राजा म्हटले जाते. हे तेल केसांची मुळे मजबूत करतात आणि रंग नैसर्गिकरीत्या गडद करते.
मेहेंदीमध्ये आवळा मिसळून लावल्याने केसांना नैसर्गिक काळा-पारवा रंग येतो आणि केस सिल्की होतात. काळ्या तिळात लोह, कॅल्शियम आणि खनिजे मुबलक असल्याने पांढऱ्या केसांवर नियंत्रण ठेवता येते.
ताणामुळेही केस पांढरे होतात. ध्यान, योग आणि पुरेशी झोप केसांचे आरोग्य सुधारते. केमिकल डाईज केसांचा नैसर्गिक रंग नष्ट करतात. त्यामुळे नैसर्गिक उपाय आणि हर्बल उत्पादने वापरणे सगळ्यात सुरक्षित आहे.