Toll Plaza: टोलच्या नियमात बदल! आता फक्त UPI आणि FASTag द्वारे पेमेंट; १ एप्रिलपासून होणार लागू

Toll Plaza No Cash Payment Rule: टोल प्लाझाबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आता टोल प्लाझावर फक्त यूपीआय किंवा फास्टॅगद्वारे पेमेंट करता येणार आहे.
Toll Plaza
Toll PlazaSaam Tv
Published On
Summary

टोल प्लाझाबाबत महत्त्वाचा निर्णय

आता टोल प्लाझावर फक्त फास्टॅग किंवा यूपीआय पेमेंट

१ एप्रिलपासून नवी नियम लागू

प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही हायवे किंवा एक्सप्रेस वेवरुन नेहमी प्रवास करत असाल तर ही गोष्ट तुम्हाला माहित असायलाच हवी. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नॅशनल हायवेवर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाचा बदल करण्याच्या तयारीत आहे. आता १ एप्रिल २०२६ पासून सर्व नॅशनल हायवेवर टोल प्लाझावर कॅश पेमेंट पूर्णपणे बंद करण्याचा प्रस्ताव दिला आहे.

टोल प्लाझावर ट्राफिक कमी होण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार आहे. आता टोल प्लाझावर तुम्ही फक्त फास्टॅग किंवा यूपीआयद्वारे पेमेंट करु शकतात.

Toll Plaza
वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी! १ फेब्रुवारीपासून FASTag च्या नियमात बदल; तुम्हाला माहित असायलाच हवा

कॅश पेमेंट पूर्णपणे बंद

NHAI चे उद्दीष्ट आहे की, टोल प्लाझावरील पेमेंट हे पूर्णपणे डिजिटल करणे. १ एप्रिलपासून हे नवीन नियम लागू होणार आहे.त्यामुळे १ एप्रिलपासून टोल प्लाझावर कॅश पेमेंट पूर्णपणे बंद होणार आहे. आता फक्त फास्टॅग आणि यूपीआयद्वारे पेमेंट करु शकतात.

कारण काय?

वाहतूक कोंडीपासून मुक्तता

टोल प्लाझावर कॅशमध्ये पेमेंट स्विकारण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. एका वाहनामुळे बाकीच्या वाहनांना खूप वाट पाहावी लागते. यामुळेच निर्णय घेतला आहे.

पारदर्शकता

डिजिटल टोल पेमेंटमुळे अधिक पारदर्शकता होणार आहे. यामुळे हिशोब ठेवण्यासाठी मदत होईल. कोणती कार टोल नाक्यावरुन गेली याचीही माहिती मिळणार आहे.

वेळेची बचत

टोल प्लाझावरील डिजिटल पेमेंटमुळे वेळेची खूप बचत होणार आहे. फक्त काही सेकंदात पेमेंट होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही.

Toll Plaza
Toll Free Travel: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल न भरता करता येणार प्रवास; नियम आहे तरी काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com