PhonePe Launches Biometric UPI Payments
PhonePe Launches Biometric UPI Paymentsgoogle

PhonePe युजर्ससाठी खुशखबर! आता पिन कोडची गरज नाही, पेमेंट करण्यासाठी नवी पद्धत, वाचा...

PhonePe Launches Biometric UPI Payments: PhonePe ने ₹5000 पर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू केले आहे. आता PIN शिवाय फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनद्वारे सुरक्षित आणि जलद पेमेंट करता येणार आहे.
Published on

सध्या भाजी वाल्यापासून ते विमान प्रवासापर्यंत सगळीकडेच ऑनलाईन पेमेंटची सुविधा असते. ऑनलाईन पेमेंटसाठी अनेक बॅकांचे आणि इतर डिजीटल पेमेंट्स अॅप वापरले जातात. जर तुम्ही PhonePe युजर्स असाल तर तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आहे. तुम्हाला आता UPI व्यवहारांसाठी बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनची सुविधा सुरू केली आहे. या नव्या फीचरमुळे वापरकर्ते आता UPI PIN टाकण्याऐवजी थेट फिंगरप्रिंट किंवा फेस रिकग्निशनच्या मदतीने पेमेंट करू शकणार आहेत. यामुळे पैसे मोबाईलमधून जाण्याचा धोका किंवा सायबर स्कॅमच्या समस्या नक्कीच कमी होतील, अशी आशा आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा सध्या ₹5,000 पर्यंतच्या UPI व्यवहारांसाठी उपलब्ध आहे. म्हणजेच लहान रकमेच्या पेमेंटसाठी आता प्रत्येक वेळी PIN लक्षात ठेवण्याची किंवा टाकण्याची गरज भासणार नाही. जर कमी प्रकाश, सेन्सरची अडचण किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे बायोमेट्रिक काम करत नसेल, तर वापरकर्ते नेहमीप्रमाणे UPI PIN वापरून व्यवहार पूर्ण करू शकतात.

PhonePe Launches Biometric UPI Payments
Tooth enamel Repair Tips: 5 सवयी दात करतात खराब, वेळीच व्हा सावध; अन्यथा...

कंपनीच्या म्हणण्यानुसार, हे फीचर वापरकर्त्यांचा पेमेंट अनुभव जास्त सुरक्षित आणि सोयीस्कर करण्यासाठी तयार करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी व्यवहार करताना PIN पाहिले जाण्याचा (shoulder-surfing) धोका टाळण्यासाठीही ही सुविधा उपयुक्त ठरणार आहे.

PhonePe चे हेड ऑफ पेमेंट्स दीप अग्रवाल यांनी सांगितले की, डिजिटल पेमेंट अधिक सोपे, जलद आणि सुरक्षित बनवणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनमुळे व्यवहार अधिक फ्रिक्शनलेस होतील आणि हार्डवेअर-लेव्हल सिक्युरिटी मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

सध्या ही सुविधा अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे आणि फिंगरप्रिंट तसेच फेस रिकग्निशन दोन्ही सपोर्ट करते. लवकरच iOS वापरकर्त्यांसाठीही ही सुविधा उपलब्ध केली जाणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

ही सुविधा सुरू करण्यासाठी सर्वप्रथम PhonePe अ‍ॅप उघडावे. त्यानंतर प्रोफाइलमध्ये जाऊन ‘Manage Payments’ हा पर्याय निवडावा. पुढे ‘Biometric Pay’ आयकॉनवर टॅप करून संबंधित बँक खात्यासाठी UPI बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन सुरू करावे. एकदा सेटअप करताना UPI PIN आणि बायोमेट्रिकची पुष्टी करावी लागेल. त्यानंतर भविष्यातील व्यवहारांसाठी थेट बायोमेट्रिकचा वापर करता येईल.

PhonePe Launches Biometric UPI Payments
Kidney: सावधान! कामात लक्ष लागत नाहीये? किडनीच्या बिघाडामुळे मेंदूवर होऊ शकतो परिणाम, तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com