Sakshi Sunil Jadhav
दाताच्या दुखण्यामध्ये ताज्या निष्कर्षांनुसार जवळपास 27% दंत रुग्णांमध्ये (Dental Patient) एनॅमल इरोझनची सुरुवातीची लक्षणे दिसतात. त्यामुळे काही गोष्टींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.
कडक ब्रश किंवा जोरात ब्रश केल्याने एनॅमलची (Enamel) झीज होते. स्वच्छतेच्या नादात दातांचे संरक्षक थर कमी होतात.
फिजी ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, लिंबांचे ज्यूस, चहा, कॉफी आणि गोड पदार्थ यामुळे दात आम्लाच्या संपर्कात येतात आणि एनॅमल झिजते.
दरवेळी आम्लयुक्त पदार्थ घेतल्यानंतर फक्त ब्रश करणं पुरेसं नसतं. तोंड पाण्याने धुणे किंवा स्ट्रॉ वापरणे फायदेशीर ठरते.
लाळ दातांचे नैसर्गिक संरक्षण करते. कमी पाणी पिणे, जास्त कॉफी किंवा मद्यपान यामुळे लाळेचे प्रमाण घटते आणि एनॅमल असुरक्षित होतात.
लिंबू, बेकिंग सोडा किंवा अॅक्टिवेटेड चारकोल यांसारखे उपाय तात्पुरता उजळपणा देतात. मात्र त्याने एनॅमल झीज वाढू शकते.
सर्व टूथपेस्ट एनॅमल संरक्षणावर लक्ष केंद्रित करत नाहीत. काही फक्त ताजेपणा किंवा व्हाइटनिंगसाठी असतात.
विशेष एनॅमल संरक्षण टूथपेस्ट एनॅमलची पुनर्बांधणी (remineralisation) करून त्याची मजबुती वाढवतात.
एकदा एनॅमल झिजले की ते पुन्हा निर्माण होत नाही. त्यामुळे सौम्य ब्रशिंग, योग्य आहार, पुरेसे पाणी आणि योग्य टूथपेस्ट वापरणे अत्यावश्यक आहे.