Toll Free Travel: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल न भरता करता येणार प्रवास; नियम आहे तरी काय?

Toll Free Travel: वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आता तुम्हाला तुमच्या घराजवळील २० किलोमीटरच्या परिसरातील टोलवरुन मोफत प्रवास करता येणार आहे.
Toll Free Travel: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल न भरता करता येणार प्रवास; नियम आहे तरी काय?
Published On
Summary

वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी

तुमच्या घराजवळील २० किलोमीटरच्या परिसरातील टोलवर मोफत प्रवास

जवळच्या टोल प्लाझावर पैसे भरावे लागणार नाही

रोज लाखो वाहने महामार्ग किंवा एक्सप्रेस वेवरुन जातात. या वाहनचालकांना रोज टोल भरावा लागतो. दरम्यान, जर तुमच्या घराजवळच टोल प्लाझा असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. तुमच्या घराजवळील २० किलोमीटरच्या आतील टोल प्लाझावर तुम्हाला टोल द्यावा लागत नाही. तुम्हाला प्रवासादरम्यान कोणतेही पैसे मोजावे लागत नाही. NHAI च्या या नियमामुळे टोल प्लाझाच्या आजूबाजूच्या परिसरातील लोकांना फायदा होणार आहे. त्यांना आता रोजच्या प्रवासासाठी टोल भरावा लागणार नाहीये.

Toll Free Travel: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल न भरता करता येणार प्रवास; नियम आहे तरी काय?
Fastag: वाहन चालकांसाठी महत्वाची बातमी! उद्यापासून फास्टॅग नियमात मोठे बदल; एका चुकीसाठी द्यावे लागतील दुप्पट पैसे

काय आहे नियम? (What is Toll Rule)

नॅशनल हायवे ऑथोरिटी ऑफ इंडियानुसार, ज्या वाहनधारकाचे घर कोणत्याही टोल प्लाझा असलेल्या २० किलोमीटरच्या क्षेत्रात असले त्यांना तो टोल भरावा लागत नाही. यासाठी वाहनधारकाकडे आधार कार्ड, वीजबिल किंवा रेशन कार्ड असा पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक आहे. हा पुरावा दाखवून तुम्ही त्या ठिकाणच्या टोल प्लाझावरुन मोफत प्रवास करु शकतात.

फायदा कसा मिळणार?

तुम्हाला तुमच्या जवळच्या टोल प्लाझावर जायचे आहे. तिथे तुम्हाला पत्त्याचा पुरावा दाखवायचा आहे. यानंतर व्हेरिफिकेशन पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला लोकल पास दिला जातो. यामुळे रोज या मार्गावरुन प्रवास केल्यावर तुम्हाला कोणताही टोल भरावा लागत नाही.

Toll Free Travel: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल न भरता करता येणार प्रवास; नियम आहे तरी काय?
Toll Free: आनंदाची बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग आणि अटल सेतूवर 'या' वाहनांना टोलमाफी; वाचा सविस्तर

Pay As You Use पॉलिसी

ही सुविधा GNSS-आधारित Pay As You Use सिस्टमअंतर्गत दिली जाते. सप्टेंबर २०२४ पासून ही पॉलिसी लागू करण्यात आली आहे. याचसोबत याआधी केंद्र सरकार आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना टोलमधून सुट होती. पोलिस, फायर ब्रिगेड आणि अॅम्ब्युलन्स, आर्मी, नेव्ही आणि एनडीआरफच्या टीमलादेखील टोलपासून सूट होती. याचसोबत टू व्हिलरलादेखील टोलपासून सूट देण्यात आली आहे.

Toll Free Travel: वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! टोल न भरता करता येणार प्रवास; नियम आहे तरी काय?
Satellite Based Toll System: नितीन गडकरींच्या ड्रीम प्रोजेक्टला स्थगिती; आता सॅटेलाइटद्वारे टोल वसुली होणार नाही

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com