Gold Rate : गुड न्यूज! चांदी तब्बल ७,२१० रूपयांनी स्वस्त, सोन्याच्या दरातही मोठी घसरण, वाचा ताजे दर

Gold Silver Rate Today Jalgaon market : सोन्याच्या दरात मोठी घसरण होऊन दोन महिन्यांनंतर तो दीड लाखांच्या खाली आला आहे. चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून बाजारात अस्थिरता कायम आहे. खरेदीला वेग येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Gold Rate
Gold Rate
Published On

संजय महाजन, जळगाव प्रतिनिधी

latest gold rate Jalgaon Maharashtra today : आखाती देशात सुरू असलेल्या युद्धासह अनेक घडामोडींमुळे सोने-चांदीच्या दराला घसरण लागली आहे. शनिवारी सोन्याच्या दरात ३,८११ रुपयांची घसरण झाल्याने सोने दोन महिन्यांनंतर दीड लाखांच्या (१,४८,६२९ रुपये तोळा) खाली आले. चांदीही ७,२१० रुपयांनी कमी झाली असून दर २,३७,९३० रुपये प्रतिकिलोवर पोहोचले आहेत. मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात मोठ्या प्रमाणात चढ उतार पाहायला मिळत आहे. युद्धामुळे सोनं आणि चांदीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात वाढतील असा अंदाज वर्तवला जात होता. पण गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घसरण नोंदवण्यात आली आहे. दोन महिन्यानंतर चांदीची किंमत दीड लाखांच्या खाली आली आहे. (why gold and silver prices are falling now)

नव्या वर्षाची सुरूवात होताच सोने-चांदीने दरवाढीचे उच्चांक गाठले होते. मात्र, जागतिक स्तरावर होत असलेल्या घडामोडींमुळे मार्च महिना सोने-चांदीसाठी घसरणीचा ठरला आहे. सव्वाचार लाखांचा टप्पा गाठणारी चांदी अडीच लाखांच्या खाली आली आहे. तर पानवेदोन लाखांवर गेलेले सोन्याचा दरही घसरला आहे. शनिवारी सोनेदेखील दीड लाखांच्या खाली आले. २० जानेवारीला १,४९, २४७ रुपयांवर सोने होते. आज दोन महिन्यांपूर्वीच्याच भावावर सोने येऊन ठेपले आहे.

Gold Rate
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहि‍णींसाठी महत्त्वाची बातमी! e-KYC साठी शेवटचे १० दिवस, फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार?

खरेदीला वेग येण्याची शक्यता

आता सोने दीड लाखाच्या खाली आल्याने लग्नसराई आणि इतर कारणांसाठी खरेदीचा ट्रेंड वाढू शकतो. मात्र अस्थिर वातावरणामुळे साशंकता आहे, अशी माहिती आंतरराष्ट्रीय बाजाराचे अभ्यासक आदित्य नवलखा यांनी दिली. दरम्यान, सोन्याची मागणी वाढल्यास पुन्हा एकदा दर वाढू शकतात असेही म्हटले जात आहे. आखाती देशातील युद्धाचा परिणाम सोन्याच्या किंमतीवर होणार असल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.

अशी राहिली सोन्याची स्थिती

₹ 1,49,247 २० जानेवारीचा दर (प्रति तोळा)

₹ 1,87,460 ३० जानेवारीचा दर (प्रति तोळा)

₹1,48,629 २१ मार्च रोजी दर (प्रति तोळा)

Gold Rate
Nitish Kumar : नितीश कुमार यांचा याच आठवड्यात राजीनामा, भाजपच्या मुख्यमंत्र्यासाठी ३० मार्च टर्निंग पाईंट का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com