Whatsapp New Feature: व्हॉटसअ‍ॅप युजर्ससाठी खुशखबर! ३ बहुप्रतिक्षित फीचर्स लवकरच येणार; जाणून घ्या सविस्तर

Whatsapp Feature: जगभरातील प्रत्येक व्यक्ती व्हॉटसअ‍ॅपचा मोठ्या प्रमाणात वापर करत असतो. त्यात दर वेळी व्हॉटसअ‍ॅप त्यांच्या युजर्ससाठी सातत्याने नवीन फिचर्स लॉंच करत असतो.
Whatsapp Feature
Whatsapp New FeatureSaam Tv
Published On

जगभरात प्रत्येक व्यक्ती व्हॉट्सअ‍ॅपचा सातत्याने वापर करत असतो. व्हॉट्सअ‍ॅप युजर्ससाठी कायम नवनवीन फीचर लॉंच करत असते. अशातच व्हॉट्सअ‍ॅपद्वारे लवकरच ३ फिचर्स लॉंच केले जाण्याशी शक्यता आहे. या फिचरद्वारे युजर्सचा व्हॉट्सअ‍ॅप कॉलिंगचा पूर्ण अनुभव पूर्णपणे बदला जाणार आहे. पंरतू अ‍ॅपल आणि गुगल या मोठ्या कंपनी व्हॉट्सअ‍ॅपच्या स्पर्धेत उतरले आहेत. असा स्थितीत व्हॉट्सअ‍ॅप त्याच्या यूजर्सबेसच्या सुरक्षेसाठी अनेक नवीन फीचर्स आणणार आहे.

Whatsapp Feature
Business Ideas: नवीन व्यवसाय सुरु करायचाय?तर हे बेसिक नियम माहितीच पाहिजेत

काय आहेत नवीन फीचर्स

व्हॉट्सअ‍ॅपद्वारे येणाऱ्या नवीन फीचर्समध्ये (features)व्हिडिओ कॉलिंग दरम्यान स्क्रीन शेअरिंग करता येऊ शकते. हे फीचर्स सध्या व्हॉट्सअ‍ॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये आणले गेले आहे. व्हॉट्सअ‍ॅपच्या स्क्रीन शेअरिंग फीचर्सनंतर व्हिडिओ कॉलिंग अ‍ॅप्स गुगल मीट आमि झूम या अ‍ॅपची स्पर्धा करण्याचा विचार केला जात आहे. हे नवीन फीचर्स व्हॉट्सअ‍ॅप यूजर्संना त्यांच्या मित्र आणि कुटुंबियासह व्हिडिओ कॉल दरम्यान मूव्ही आणि इतर गोष्टी एकत्रित करण्यास अनुमती देते.

जर व्हॉट्सअ‍ॅपच्या येणाऱ्या नवीन फिचर्सबद्दल बोललो तर, यूजर्संना व्हॉट्सअ‍ॅपवर(whatsapp) एकाच वेळी ३२ लोकांना व्हिडिओ कॉलमध्ये समाविष्ट करता येईल. म्हणजेच व्हॉट्सअ‍ॅपवर तुम्ही कार्यालयीन मीटिंग घेऊ शकता,जिथे जास्तीत जास्त ३२ लोकांचा अ‍ॅड केले जाऊ शकते.

व्हॉट्सअ‍ॅपवर लवकरच ग्रुप व्हिडिओ कॉलिंग (Calling)दरम्यान स्वत:ला हायलाइट करण्यास येऊ शकते तसेच त्या ग्रुपमध्ये ग्रुप अ‍ॅक्टिव्हिटीचे नेतृत्वही करण्यात येईल. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅप आणखी एक नवीन फिचर्सवर काम करत आहे,ज्यामध्ये व्हॉट्सअ‍ॅप यूजर्स थेट त्यांचे मेसेज डिव्हाइसवरुन ट्रान्स्क्राइब करु शकतील. सध्या व्हॉट्सअ‍ॅप बीटा अपडेटमध्ये हे फीचर्स दिसून येते. लवकरच हे फीचर्स अँड्रॉईड यूजर्ससाठी आणले जाऊ शकते.

Whatsapp Feature
TECH TIPS: नवीन मोबाइल असूनही चार्जिंग फार काळ टिकत नाही? या सोप्या टिप्स अवलंबा!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com