Oppo F27 Pro+ 5G स्मार्टफोनची भारतात जोरदार एंट्री; 64MP कॅमेरासह आहेत दमदार फीचर्स

OPPO F27 Pro+ 5G Launched Know Features: Oppo कंपनीने F-Series चा नवीन स्मार्टफोन लॉन्च केलाय. फोनची प्री-ऑर्डर केवळ फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि ओप्पो स्टोअर्सवर करता येणार आहे. या फोनमध्ये कमालीचे फीचर्स देण्यात आली आहेत.
Oppo F27 Pro+ 5G स्मार्टफोनची भारतात जोरदार एंट्री; 64MP कॅमेरासह आहेत दमदार फीचर्स
OPPO F27 Pro+ 5GOPPO

Oppo कंपनीने आपल्या F-Series चा नवीन स्मार्टफोन Oppo F27 Pro+ भारतात लॉन्च केलाय. हा फोनची प्री ऑर्डर केवळ फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि ओप्पोच्या शोरूमध्ये उपलब्ध आहे. Oppo F27 Pro+ हा IP69 रेटिंगसह लॉन्च झालेला कंपनीचा भारतातील पहिला फोन आहे.

या फोनमध्ये मिलिटरी लेव्हल MIL-810H सर्टिफिकेशन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टस 2 प्रोटेक्शन देखील आहे. Oppo चा हा फोन 5000mAh बॅटरी आणि 256 GB स्टोरेज सारख्या विविध फीचर्स आहेत. लेटेस्ट Oppo स्मार्टफोनमध्ये काय खास आहे ते जाणून घ्या.

OPPO F27 Pro+ 5G किंमत

Oppo F27 Pro+ स्मार्टफोनचा 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंट 27,999 रुपयांना लॉन्च करण्यात आलाय. तर 8 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज व्हेरिएंटच्या फोनची किंमत 29,999 रुपये असेल. फोनची प्री-ऑर्डर केवळ फ्लिपकार्ट, ॲमेझॉन आणि ओप्पो स्टोअर्सवरून केली जाऊ शकते. 20 जूनपासून देशात हँडसेटची विक्री सुरू होणार आहे.

लॉन्च ऑफर अंतर्गत Oppo चा हा फोन HDFC, ICICI आणि SBI कार्डद्वारे 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंटवर खरेदी करता येईल. कंपनी या हँडसेटसह 12 महिने मोफत अपघाती आणि लिक्विड डॅमेज प्रोटेक्शन संरक्षण योजना देखील ऑफर देत आहे.

OPPO F27 Pro+ 5G फीचर्स

Oppo F27 Pro+ स्मार्टफोन कॉसमॉस रिंग डिझाइनसह येतो. हा फोन मागील कॅमेरा मॉड्यूलसह ​​लॉन्च करण्यात आलाय. हा फोन प्रीमियम लेदर बॅक पॅनलसह येतो. Oppo च्या या हँडसेटमध्ये 6.7 इंचाची 3D कर्व्ड AMOLED स्क्रीन आहे. यात FullHD+ (2412×1080 pixels) रिझोल्यूशन देण्यात आले आहे.

Oppo च्या या हँडसेटमध्ये MediaTek Dimension 7050 प्रोसेसर आणि Mali G68 GPU आहे. फोनमध्ये 8 GB पर्यंत रॅम आहे. एक्सटेंडेड रॅम फीचरद्वारे रॅम 8 जीबीपर्यंत वाढवता येते. हँडसेटमध्ये 128 GB/256 GB इनबिल्ट स्टोरेजचा पर्याय देण्यात आलाय. हा फोन Android 14 आधारित ColorOS 14 सह येतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com