Ticket Booking : तिकीट बुक करताना पैसे कट झाले पण तिकीट मिळाले नाही? अशा प्रकारे मिळवा रिफंड

IRCTC Tatkal Ticket Booking Refund Tips : तत्काळ तिकीट बुक करताना पैसे कट झाले पण तिकीट मिळाले नाही? IRCTC रिफंड कसा मिळतो, किती दिवस लागतात आणि तक्रार कुठे करायची जाणून घ्या.
Tatkal Ticket Refund IRCTC Money Deducted But Ticket Not Booked
Tatkal Ticket Refund IRCTC Money Deducted But Ticket Not BookedAI Image
Published On
Summary
  • तत्काळ तिकीट बुक करताना पैसे कट झाले पण तिकीट मिळाले नाही? तर काय करावे

  • IRCTC रिफंड कसा मिळतो याबाबत जाणून घ्या

  • रिफंड मिळण्यासाठी ७ ते ८ दिवस लागतात

  • तक्रार कुठे करायची जाणून घ्या.

सणासुदीचा काळ सुरू झाला की अनेकजण सुट्टी निमित्त फिरण्याचं प्लॅनिंग करतात. मात्र या दरम्यान रेल्वेने प्रवास करण्यासाठी तिकीट मिळवणे हे मोठे आव्हान बनते. तिकिटांची उपलब्धता कमी असल्याने अनेक प्रवासी तत्काळ तिकिटाचा पर्याय निवडतात. मात्र तत्काळ बुकिंगमध्ये मिनिटांच्या फरकाने घाईत केलेल्या छोट्या चुका तिकीट बुकिंग हुकण्याचे कारण ठरू शकतात. विशेष म्हणजे तिकीट बुक न होता खात्यातून पैसे कट झाल्याची समस्याही अनेकदा समोर येते. मात्र हे पैसे कट झाले तर परत मिळवता येतात का? आणि हा रिफंड कसा मिळतो? तुम्हाला माहिती आहे का? याबाबत सविस्तर माहिती जाणून घ्या.

तत्काळ बुकिंगपूर्वी 'ही' तयारी करा

तत्काळ तिकीट बुक करण्यापूर्वी IRCTC खात्यात आधीच लॉगिन करून ठेवा. बुकिंगच्या वेळी वेबसाइट किंवा अॅपवर पुन्हा लॉगिन करण्यात वेळ गेल्यास उपलब्ध सीट्स संपण्याची शक्यता असते. प्रवाशांची नावे, वय, लिंग यांसारखी माहिती शक्य असल्यास आधीच तयार ठेवा. पेमेंटसाठी UPI, डेबिट किंवा क्रेडिट कार्ड यापैकी कोणता पर्याय वापरणार आहात, हेही ठरवून ठेवा. त्यामुळे बुकिंगच्या वेळी माहिती भरण्यात अनावश्यक वेळ जाणार नाही. तुम्हाला कोणत्या ट्रेनमध्ये प्रवास करायचा आहे, हेही आधी ठरवा. उदाहरणार्थ, दोन पर्याय असतील तर दोन्ही ट्रेनची वेळ,मार्ग आधी तपासा. बुकिंग सुरू झाल्यानंतर कोणती ट्रेन निवडायची याचा विचार करत बसल्यास वेळ निघून जाऊ शकतो.

Tatkal Ticket Refund IRCTC Money Deducted But Ticket Not Booked
Rain Alert : महाराष्ट्रात विजांसह वादळी पाऊस ; ४ जिल्ह्यांना येलो अलर्ट, वाचा हवामानाचा अंदाज

पैसे कट झाले, पण तिकीट मिळाले नाही तर?

कधी कधी तिकीट बुक होत नाही, मात्र बँक खाते किंवा पेमेंट माध्यमातून पैसे कट होतात. अशावेळी लगेच घाबरून जाण्याची गरज नाही. सगळ्यात आधी IRCTC मधील Booked Ticket History तपासा. तिथे तिकीट दिसत नसेल तर बुकिंग पूर्ण झालेले नसण्याची शक्यता आहे. यानंतर पैसे कोणत्या माध्यमातून कट झाले, हे तपासा. तिकीट बुक न झाल्यास संबंधित रक्कम साधारणपणे काही दिवसांत त्याच पेमेंट अकाउंटमध्ये परत येते.

Tatkal Ticket Refund IRCTC Money Deducted But Ticket Not Booked
Hair Care : केसांमधील कोंड्यावर सापडला ५ रुपयांचा उपाय, खोबरेल तेलात मिसळा, एका झटक्यात नाहीसा होईल स्कॅल्पचा त्रास

किती दिवसात रिफंड मिळतो?

साधारण ७ ते ८ दिवसांत रिफंड न मिळाल्यास IRCTCच्या eQuery किंवा ग्राहक सेवेशी संपर्क करावा. तक्रार करताना ट्रेन नंबर, व्यवहाराची रक्कम, PNR किंवा व्यवहार क्रमांक आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट जवळ ठेवा. यामुळे तुमच्या तक्रारीवर तात्काळ तोडगा निघू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com