TATA Motors : इलेक्ट्रिक कार्सने बदललं वाहन उद्योगक्षेत्र, गेल्या 10 वर्षात असा पडला प्रभाव

TATA Motors Digital Evolution : टाटा मोटर्स ही देशातील वाहन उत्पादक कंपन्यांपैकी लोकप्रिय कंपनी आहे. टाटा मोटर्सने डिजिटलमध्ये खूप प्रगती केली आहे. त्यांनी नवनवीन फीचर लाँच करुन ग्राहकांना चांगला अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहे.
TATA Motors Digital Evolution
TATA Motors SAAM TV
Published On

गेल्या दहा वर्षांत वाहन (ओटोमोटिव्ह) उद्योगक्षेत्रात वेगाने प्रगती झाली आहे, पारंपरिक बटनांद्वारे चालवल्या जाणाऱ्या वाहनांचे रूपांतर स्मार्ट, इंटेलिजंट, नेटवर्क्ड घटकांमध्ये झाल्यामुळे या क्षेत्राचा कायापालट झाला आहे. या वाहनांसाठी सॉफ्टवेअर ऑन व्हील्स संज्ञा खूपच चपखल बसते. भौतिक शास्त्रे आणि यांत्रिक इंजिनीअरिंगचे महत्त्व अद्याप कायम असले तरी इलेक्ट्रॉनिक्स व सॉफ्टवेअर हे घटक वाहतूक उद्योगातील वापरकर्त्याचा अनुभव (यूएक्स) पुढे नेण्यात केंद्रस्थानी आहेत. यूजर एक्स्पिरिअन्स अर्थात यूएक्स अधिक चांगला करण्यासाठी वाहनामधील प्रत्येक स्पर्शबिंदूचा शक्य तेवढा चांगला उपयोग केला जातो. याचे ध्येय युजरला सातत्याने आनंद देत राहणे, त्यांच्या खरेदीच्या पसंतीवर प्रभाव टाकणे आणि भविष्यकाळातील वाहतूक क्षेत्राला आकार देणे हेच आहे.

TATA Motors Digital Evolution
फक्त २३५१ रुपये देऊन घरी आणा Honda Activa; जाणून घ्या, संपूर्ण डिटेल्स एका क्लिकवर

प्रगत तंत्रज्ञानांचा वापर

ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चुअरर्स (ओईएम) प्रगत तंत्रज्ञानांचा स्वीकार करून स्वत:चे स्थान पक्के करत आहेत. कनेक्टिविटीवर लक्ष केंद्रित करून तसेच संशोधन व विकासात (आरअँडडी) गुंतवणूक करून ते वाहतूक क्षेत्रातील उदयोन्मुख वाढीच्या संधींचा लाभ घेत आहेत.

ग्राहकांचे प्राधान्य

भारतातील कार ग्राहकांच्या, विशेषत: तरुण कार ग्राहक समूहाच्या, प्राधान्यक्रमांमध्ये दखलपात्र बदल दिसून येत आहे. इंधन कार्यक्षमता व खर्च यांसारख्या पारंपरिकरित्या विचारात घेतल्या जाणाऱ्या बाबींहून अधिक महत्त्व कनेक्टिविटी व सुरक्षितता यांच्याशी निगडित घटकांना दिले जात असल्याचे एका जागतिक सर्वेक्षणात आढळले आहे. भारताच्या लोकसंख्येत जेनझेड समूहाचा वाटा लक्षणीय म्हणजेच २५ टक्के आहे. ही पिढी त्यांच्या तंत्रज्ञानावर आधारित जीवनशैलींना सुसंगत अशा वाहनांना पसंती देते. कनेक्टेड कार इकोसिस्टम, इन-कार एण्टरटेन्मेंट सिस्टम्स, ईव्ही तंत्रज्ञान आणि प्रगत ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम्स यांसारख्या आधुनिक सुविधा अधिकाधिक महत्त्वपूर्ण होत आहेत. तरुण ग्राहक आरोग्य, कनेक्टिविटी व शाश्वतता यांवर भर देत असल्यामुळे या नवीन प्राधान्यक्रमांशी जुळवून घेण्यासाठी वाहतूक उद्योगही उत्क्रांत होत आहे आणि कार खरेदीच्या सवयींचे एक नवीन युग आकाराला येत आहे.

डिजिटल भारताला चालना

देशातील व्यापक डिजिटल रूपांतरणाचे प्रतिबिंब भारताच्या वाहतूक क्षेत्रातही दिसते. सरकारच्या डिजिटल इंडिया उपक्रमाशी हे सुसंगत आहे. भारतात नागरिकांचे राहणीमान सुधारण्यासाठी आणि आर्थिक वाढीला चालना देण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञाने स्वीकारली जात असतानाच, ग्राहकांच्या बदलत्या प्राधान्यक्रमांशी जुळवून घेण्याच्या दृष्टीने वाहतूक उद्योग उत्क्रांत होत आहे. कार हे आता केवळ वाहतुकीचे साधन उरलेले नाही; ते इंटेलिजंट, कनेक्टेड होत आहे आणि जीवनशैलीची निवड त्यातून दिसून येते. सेन्सर डेटा व एआय अल्गोरिदम्सचा लाभ घेऊन वाहने अधिक सुरक्षित, अधिक कार्यक्षम, अधिक आरामदायी होत आहेत, अधिक प्रगत वाहतुकीचे पर्याय देत आहेत. या तंत्रज्ञानात्मक एकात्मीकरणामुळे गाडी चालवण्याचा अनुभव सुधारतो आणि डिजिटल समावेशन व तंत्रज्ञानात्मकदृष्ट्या प्रगत भविष्यकाळ यांच्याप्रती भारताची बांधिलकीही यातून अधोरेखित होते.

वाहनांसाठी आकर्षक डिझाइन

वाहतूक उद्योगामध्ये वाहनकेंद्री दृष्टिकोनापासून वापरकर्त्याला केंद्रस्थानी ठेवणाऱ्या डिझाइन तत्त्वापर्यंत स्थित्यंतर वेगाने घडत आहे. यूजर-सेंटर्ड डिझाइनसारख्या (यूसीडी) एथ्नोग्राफिक संशोधन व वापरक्षमतेच्या चाचण्या घेणाऱ्या तंत्रांच्या माध्यमातून वापरकर्त्याचे वर्तन व पसंती यांबद्दल मोलाची माहिती प्राप्त होत आहे. ग्राहकांच्या आयुष्यांमध्ये सहजगत्या एकरूप होणारी उत्पादने तयार करणे यामुळे शक्य होत आहे. यात इंट्युइटिव्ह इन्फोटेनमेंट प्रणालींपासून व्यक्तिनुरूप वाहतूक उत्पादनांपर्यंत अनेक उत्पादनांचा समावेश होतो. सॉफ्टवेअर डिफाइन्ड व्हेइकल्स (एसडीव्ही) म्हणून आपले स्थान निर्माण करणे, वापरकर्त्याच्या गरजा व पसंतीला प्राधान्य देणे अधिक महत्त्वाचे झाले आहे, यातूनच सातत्याने उत्क्रांत होत राहणाऱ्या वाहन क्षेत्रातील लवचिकता व समायोजनशीलता यांची गरजही अधोरेखित होते.

TATA Motors Digital Evolution
ब्लूटूथ कॉलिंग अन् १८ दिवसांची बॅटरी लाइफसह Redmi Watch 5 Active स्मार्टवॉच लाँच; किंमत किती?

सरकारी धोरणांमुळे वाहन कंपन्याना नवीन आकार

नॅशनल इलेक्ट्रिक मोबिलिटी मिशन प्लान २०२० सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून वाहतूक क्षेत्रात ग्राहकांच्या अनुभवाला प्राधान्य देण्यात भारत सरकार सक्रिय भूमिका निभावत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी, इंधन सुरक्षितता वाढवण्यासाठी आणि ग्राहकाच्या गरजांची पूर्तता करणारे परवडण्याजोगे, पर्यावरणपूरक वाहतूक पर्याय पुरवण्यासाठी तंत्रज्ञानात्मक नवोन्मेष स्वीकारण्यावर ही योजना लक्ष केंद्रित करते.

प्रोत्साहन, अनुदान व पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक यांच्या माध्यमातून सरकार पर्यावरणपूरक वाहतुकीच्या दिशेने चाललेल्या स्थित्यंतराला पाठबळ देत आहे, परिणामी कार्यक्षम, शाश्वत व किफायतशीर वाहतूक उत्पादनांच्या माध्यमातून ग्राहकांना अधिक चांगला अनुभव दिला जात आहे. या धोरणी दृष्टीकोनामुळे ग्राहकांच्या बदलत्या मागण्यांनुसार अधिक चतुर वाहतूक परिसंस्था निर्माण करणाऱ्या राष्ट्रांमध्ये भारत अग्रेसर आहे.

लेखन: स्वेन पतुश्का, सीटीओ, टाटा मोटर्स पॅसेंजर्स अँड इलेक्ट्रिक व्हेइकल्स

TATA Motors Digital Evolution
Poco Pad 5G : 8GB रॅम अन् 10000mAh पॉवरफुल बॅटरीसह POCO लवकरच करणार नवीन टॅबलेट लाँच

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com