Poco Pad 5G : 8GB रॅम अन् 10000mAh पॉवरफुल बॅटरीसह POCO लवकरच करणार नवीन टॅबलेट लाँच

Tablet Specifications : टॅबलेट वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! पोको लवकरच नवीन टॅबलेट लाँच करणार आहे. तारीख आणि पॉवरफुल फीचर्स जाणून घ्या.
Tablet Specifications
Poco Pad 5GSAAM TV
Published On

आजकाल डिजिटल युगात लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅबलेट याशिवाय कोणतही काम करणे अशक्य आहे. वापरानुसार या उपकरणांमध्ये सतत बदल होत असतो. त्यामुळे कंपनी नवीन फीचर्स सोबत नवीन प्रोडक्ट लाँच करत असतात. सध्या पोको आपला नवीन टॅबलेट लाँच करणार आहे.

स्मार्टफोन निर्माता पोको लवकरच बाजारात एक नवीन टॅबलेट लाँच करणार आहे. कंपनी या नवीन टॅबलेटमध्ये 10 हजार mAh ची पॉवरफुल बॅटरी देणार असून टॅबलेटमध्ये 8 GB रॅम देखील मिळणार आहे.

कधी होणार टॅबलेट लाँच?

कंपनी 23 ऑगस्ट रोजी हा नवीन टॅबलेट देशात लाँच करणार आहे. हा टॅबलेट कंपनीने सध्या निळ्या रंगामध्ये उपलब्ध केला आहे. कंपनी Poco Pad 5G सह कीबोर्ड आणि एक स्टायलस पेन देखील देईल.अद्याप कंपनीने याची किंमत जाहीर केली नाही आहे.

डिझाइन

  • स्पीकर ग्रिल्स युक्त टॅबलेट

  • यूएसबी टाइप सी पोर्ट

  • 3.5 मिमी ऑडिओ जॅक

  • आकर्षक रचना

Tablet Specifications
Oppo A3 5G : सुपर डील! वीस हजाराच्या आत मिळेल सुपर डुपर फीचर्ससह 50MP कॅमेरा असलेला स्मार्टफोन

वैशिष्ट्ये

Poco Pad 5G या नव्याकोऱ्या टॅबलेटमध्ये 12.1 इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे. हा डिस्प्ले 120hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. हा नवीन टॅबलेट Snapdragon 7s Gen 2 प्रोसेसरसह लाँच केला जाईल. याशिवाय या नवीन टॅबलेटमध्ये 256GB स्टोरेज सोबत 8GB रॅम देखील मिळणार आहे. हा टॅबलेट अँड्रॉइड 14 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. तसेच या टॅबलेटला दोन्ही बाजूंना 8 मेगापिक्सेलचे कॅमेरा दिला आहे. पॉवरसाठी, Poco Pad 5G मध्ये 10,000mAh ची पॉवरफुल बॅटरी दिली जाईल. ही बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल.

Tablet Specifications
Redmi A3x : 8GB रॅम, 5000 mAh बॅटरी, जबरदस्त फिचर्स; आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन बाजारात दाखल

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com