Infinix ने भारतात लॉन्च केला पहिला टॅबलेट, 7000mAh बॅटरीसह 8GB RAM; किंमत किती?

Infinix XPad: Infinix ने भारतात आपला पहिला टॅबलेट लॉन्च केला आहे. Infinix Xpad मध्ये 8 GB RAM सोबत 7000 mAh बॅटरी मिळणार आहे.
Infinix ने लॉन्च केला पहिला टॅबलेट, 7000mAh बॅटरीसह 8GB RAM; किंमत किती?
Infinix XPadSaam Tv
Published On

Infinix ने भारतात आपला पहिला टॅबलेट लॉन्च केला आहे. Infinix Xpad मध्ये 8 GB RAM सोबत 7000 mAh बॅटरी मिळणार आहे. कंपनीने या नवीन टॅबमध्ये अनेक ॲडव्हान्स फीचर्सही दिले आहेत. Infinix Xpad एका आकर्षक डिझाइनसह लॉन्च करण्यात आला आहे. या टॅबमध्ये 11-इंचाचा डिस्प्ले ग्राहकांना मिळणार आहे.

Infinix Xpad च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, या टॅबमध्ये 11-इंचाचा LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90 Hz चा रिफ्रेश रेटसह येत. यात मेटल युनिबॉडी आहे. याशिवाय Infinix Xpad मध्ये 2.2 GHz ऑक्टा-कोर CPU सह Helio G99 चिपसेट प्रोसेसर आहे. कंपनीने या नवीन टॅबमध्ये तीन वेगवेगळे पॉवर मोडही दिले आहेत. यात XArena गेम स्पेस देखील आहे

Infinix ने लॉन्च केला पहिला टॅबलेट, 7000mAh बॅटरीसह 8GB RAM; किंमत किती?
Realme C63 5G Launch : १० हजारांपेक्षा कमी किंमत, रिअलमीचा नवा स्मार्टफोन, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स!

Infinix च्या पहिल्या टॅबमध्ये कंपनीने दोन प्रकार दिले आहेत. यात 4GB+128GB स्टोरेज आहे. तर याचा दुसरा प्रकार 8GB RAM + 256GB इनबिल्ट स्टोरेजसह येतो. कंपनीने Infinix Xpad हा ब्लू, ब्लॅक आणि गोल्ड अशा तीन रंगात बाजारात आणला आहे.

कॅमेरा

Infinix च्या या नवीन टॅबच्या कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर कंपनीने यात 8 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी डिव्हाइसमध्ये 9 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे. Infinix ने या टॅबमध्ये स्वतःची Folax आर्टिफिशियल इंटेलिजन्स दिली आहे. यात ChatGPT वर आधारित व्हॉइस असिस्टंट आहे.

Infinix ने लॉन्च केला पहिला टॅबलेट, 7000mAh बॅटरीसह 8GB RAM; किंमत किती?
Whatsapp Feature: व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन फीचर! ग्रुपमध्ये जॉइन होण्याआधीच मिळणार ग्रुपची संपूर्ण माहिती

Infinix ने या नवीन टॅबलेटमध्ये चार स्पीकर देखील दिले आहेत. याच्या बॅटरीबद्दल बोलायचे झाले तर या टॅबमध्ये 7,000mAh ची पॉवरफुल बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 18W वायर्ड चार्जिंगलाही सपोर्ट करते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, हा टॅबलेट फक्त 40 मिनिटांत 0 ते 50 टक्के चार्ज होतो, असं कंपनीचं म्हणणं आहे. सध्या कंपनीने या नवीन टॅबच्या किमती जाहीर केल्या नाहीत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com