Redmi A3x : 8GB रॅम, 5000 mAh बॅटरी, जबरदस्त फिचर्स; आतापर्यंतचा सर्वात स्वस्त फोन बाजारात दाखल

Redmi A3x Smartphone : Redmi ने Redmi A3x हा 7,999 आणि 6,999 यांमधील स्वस्त फोन बाजारात आणला आहे. Amazon आणि Xiaomi च्या अधिकृत साइटवरून हा फोन खरेदी करता येणार आहे.
Redmi A3x
Redmi A3xSaam Digital
Published On

Redmi ने बजेट सेगमेंटमधील ग्राहकांसाठी Redmi A3x हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. वर्तुळाकार कॅमेरा डिझाईन आणि पारदर्शक मिरर ग्लास रियर पॅनल असलेल्या या फोन अगदी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात कंपनीने मोबाईल बाजारात आणला आहे. या बजेट फोनमध्ये युनिसॉक प्रोसेसर आणि ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देखील आहे.

Redmi A3x
Retirement Plan: १५ वर्षानंतर एक कोटी मिळवा, निवृत्तीनंतर प्रतिमहिना ५० हजार, गुंतवणुकीचा भन्नाट प्लॅन एकदा पाहाच

Redmi A3x Amazon आणि Xiaomi च्या अधिकृत साइटवरून खरेदी करता येईल. या फोनचे चार कलर व्हेरियंट आहेत, ओशन ग्रीन, मिडनाईट ब्लॅक, स्टाररी व्हाइट आणि ऑलिव्ह ग्रीन. आता या बजेट फोनची किंमत किती आहे आणि या फोनमध्ये तुम्हाला कोणते फीचर्स मिळतील? याविषयी जाणून घेऊयात.

Redmi A3x फोनमध्ये 90 Hz रिफ्रेश रेट आणि 500 ​​निट्स पीक ब्राइटनेस सपोर्टसह 6.71-इंच HD+ रिझोल्यूशन (720 x 1,650 पिक्सेल) LCD डॉट ड्रॉप स्क्रीन आहे. स्क्रीनच्या संरक्षणासाठी कंपनीने कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनचा वापर केला आहे.

या फोनमध्ये यूनिसॉक T603 प्रोसेसर वापरण्यात आला आहे. शिवाय 4 GB LPDDR4X रॅम आहे जी 4 GB व्हर्च्युअल रॅमच्या मदतीने 8 GB पर्यंत वाढवता येते. फोटो, व्हिडिओ आणि इतर गोष्टी जतन करण्यासाठी, फोनमध्ये 128 GB eMMC 5.1 अंतर्गत स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1 TB पर्यंत वाढवता येते.

हा लेटेस्ट Redmi मोबाईल Android 14 वर आधारित Hyper OS वर काम करतो, याशिवाय कंपनीने वचन दिले आहे की या फोनला तीन वर्षांसाठी दोन Android अपग्रेड आणि सिक्युरिटी अपडेट्स मिळत राहतील.

Redmi A3x
Share Market Today : बाजार सुरु होताच ४ लाख कोटींची कमाई; सेन्सेक्स-निफ्टीत जबरदस्त उसळी, कोणते ५ शेअर ठरले टॉप गेनर?

फोनच्या मागील बाजूस 8-मेगापिक्सलचा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, तर समोर 5-मेगापिक्सेल कॅमेरा सेन्सर सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी वापर करता येणार आहे.

शक्तिशाली 5000mAh बॅटरी आहे जी 10W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते

Wi-Fi, 4G LTE, GPS आणि ब्लूटूथ आवृत्ती 5.4 व्यतिरिक्त, या फोनमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक सपोर्ट आहे. सुरक्षेसाठी फोनच्या पॉवर बटनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे, याशिवाय एआय फेस अनलॉक फीचर देखील देतो.

Redmi मोबाईल फोनचे दोन प्रकार लॉन्च केले गेले आहेत, 3GB/64GB आणि 4GB/128GB. 3 GB व्हेरिएंट 6,999 रुपयांना मिळेल, तर 4 GB व्हेरिएंट 7,999 रुपयांना उपलब्ध असणार आहे.

Redmi A3x
Old Pension : जुनी पेन्शन, सरकारला टेंशन; कर्मचाऱ्यांचा पुन्हा एल्गार, विधानसभेपूर्वी सरकारची कोंडी

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com