Share Market Today : बाजार सुरु होताच ४ लाख कोटींची कमाई; सेन्सेक्स-निफ्टीत जबरदस्त उसळी, कोणते ५ शेअर ठरले टॉप गेनर?

Share Market Update : शेअर बाजार सुरु होताच गुंतवणूकदारांनी ४ लाख कोटींची कमाई केली. शेअर बाजारात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. आज ५ शेअर्सने जबरदस्त आघाडी घेतल्याचे दिसून आली.
शेअर बाजार
Share Market TodaySaam Tv
Published On

नवी दिल्ली : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी शेअर बाजारात उसळी पाहायला मिळत आहे. सेन्सेक्सने आठवड्याच्या शेवटच्या दिवशी ६०० अंकांनी उसळी घेत ७९,७५४.८५ वर सुरु झाला. निफ्टी २०० अंकांनी उसळी घेऊन २४,३३४.८५ पातळीवर सुरु झाला. बीसीई सेन्सेक्सचे सर्व शेअर्स ग्रीन झोनमध्ये दिसत आहेत. टॉप ३० शेअर्समध्ये महिंद्रा अँड महिंद्राचा शेअर २.७७ टक्क्यांनी वधारला. त्यानंतर टाटा मोटर्स, टेक महिंद्रा, टीसीएस, जेएसडब्लू स्टील आणि आयसीआयसी बँकेचे शेअर आघाडीवर आहेत.

आज शेअर बाजारात सकाळी ९.३० वाजता सेन्सेक्स ८१२ अंकानी वधारून ७९,९१६ पातळीवर व्यवहार करत आहे. तर निफ्टी २४३ अंकांनी उसळी घेऊन २४,३८७ पातळीवर पोहोचला. तर बँक निफ्टी ५०७ अंकांनी उसळी घेत ५०,२३४ पातळीवर व्यवहार करत आहे. अमेरिकेच्या शेअर बाजारातील जबरदस्त उसळीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसत आहे.

शेअर बाजार
Share Market Prediction : आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मार्केटचा मूड कसा असेल? कोणता शेअर मालामाल करणार? वाचा

गुंतवणूकदारांनी कमावले ४ लाख कोटी

शुक्रवारी ग्लोबल शेअर बाजारातील उसळीमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी वधारला आहे. रोजगार आणि बेरोजगारांची आकडेवारी नव्याने आल्यानंतर अमेरिकेत मंदीची शक्यता धुसर झाली आहे. यामुळे शेअर बाजार वधारला आहे.

शेअर बाजार
Tea Shop Business : चहाचा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात

शेअर बाजारात बीएसईच्या यादीतील कंपन्याच्या मार्केट कॅपिटलमध्ये ३.८७ लाख कोटींची वाढ झाली आहे. त्यामुळे मार्केट कॅपिटल ४४८.१६ लाख कोटी रुपये झाली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना ४ लाख कोटींचा फायदा झाला आहे.

जेनसर टेक्नोलॉजीमध्ये ५ टक्क्यांनी वधारला आहे. फर्स्ट सॉल्यूशनच्या शेअर्समध्ये ८ टक्क्यांनी वधारला. तर सीडीएसएल शेअर्समध्ये ४ टक्क्यांनी उसळी घेतली. ओला शेअर्समध्ये ११ टक्क्यांनी वधारला आहे. RVNL, DLFच्या शेअर्समध्ये ४ टक्क्यांनी उसळी घेतली आहे. तर Mpaisaच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांनी वधारला आहे. एल अँड टीच्या शेअर ४.३२ टक्क्यांनी वधारला आहे. अपोलो हॉस्पिटलच्या शेअर्सने ३ टक्क्यांनी उसळी घेतली आहे.

एनएसईवर आज ५४ शेअर्सला अपर सर्किट लागला. ३० शेअर लोअर सर्किटवर व्यवहार करत आहे. दुसरीकडे ४९ शेअर्सने ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तर गाठला आहे. तर १६ शेअर्सने ५२ आठवड्यांचा निच्चांकी स्तर गाठला आहे. एनएसईमध्ये २,२६९ शेअर्सपैकी १७७७ शेअर्सने उसळी घेतली आहे. तर ४४१ शेअर्समध्ये घसरण पाहायला मिळाली. तर ५१ शेअर्समध्ये कोणताही बदल पाहायला मिळाला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com