Retirement Plan: १५ वर्षानंतर एक कोटी मिळवा, निवृत्तीनंतर प्रतिमहिना ५० हजार, गुंतवणुकीचा भन्नाट प्लॅन एकदा पाहाच

Savings and Investments Tips: तुम्हाला पगाराचा १० ते २० टक्के भाग प्रत्येक महिन्याला गुंतवावा लागेल. समजा, तुमचा पगार ५० हजार रुपये महिना इतका आहे. तर
Retirement Plans
Retirement PlansSaam Tv
Published On

Retirement Plan : सचिन हा पुण्यातील एका खासगी कंपनीमध्ये मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. त्याचं वय ३५ वर्ष इतके आहे. सचिनचे लग्न झालेले आहे, त्याला पाच वर्षांची मुलगी आहे. सचिनला वयाच्या ५० व्या वर्षी निवृत्त व्हायचे आहे. त्याला आपल्या कमाईतील काही भाग (Savings and Investments Tips ) आशा ठिकाणी गुंतवायचाय, जिथून निवृत्तीनंतर त्याला मोठी रक्कम तर मिळालेच, पण त्याशिवाय प्रतिमहिना ५० हजार रुपये मिळावेत.

तुम्हीही सचिनप्रमाणेच विचार करत आहात का? आम्ही तुमच्यासाठी गुंतवणुकीचा प्लॅन (Savings and Investments Tips) सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही निवृत्तीनंतर महिन्याला ५० हजार रुपयांची कमाई कराल.

किती पैसे वाचवावे लागतील....

तुम्हाला पगाराचा १० ते २० टक्के भाग प्रत्येक महिन्याला गुंतवावा लागेल. समजा, तुमचा पगार ५० हजार रुपये महिना इतका आहे. तर तुम्हाला महिन्याला कमीत कमी १० हजार रुपये गुंतवावे लागतील. जर तुमचा पगार ५० हजार रुपये नसेल, तर कमाईचा दुसरा पर्यायही तुम्हाला पाहावा लागेल.. तुम्हाला कमीत कमी १० हजार रुपये गुंतावावेच लागतील.

Retirement Plans
SIP Crorepati Route: फक्त ५ हजारांची महिना बचत करून कोट्यधीश व्हा, जाणून घ्या नेमकं गणित

कुठे कराल गुंतवणूक -

तुम्हाला SIP द्वारे म्युच्युअल फंडमध्ये महिन्याला दहा हजार असे १५ वर्षांपर्यंत गुंतवावे लागतील. १५ वर्षानंतर तुम्ही निवृत्तीचा विचार करत आहात, त्यामुळे फक्त १५ वर्षांचाच आपण विचार करत आहोत. आणखी एक महत्वाचे, गुंतवणुकीच रक्कम प्रत्येक महिन्याला दहा टक्क्यांनी वाढवावी लागेल. एसआयपीद्वारे आशा प्रकारच्या गुंतवणुकीला स्टेप-अप एसआयपी असे म्हटले जाते.

जर तुम्ही पहिल्या वर्षी प्रत्येक महिन्याला १० हजार रुपये गुंतवले, तर पुढील वर्षी दहा टक्के रक्कम वाढवावी, म्हणजे, दुसऱ्या वर्षी प्रत्येक महिन्याला ११ हजार रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. असेच प्रत्येक वर्षी रक्कम वाढवावी लागेल.

Retirement Plans
Invsement Tips: फक्त १ हजार रुपयांमध्ये व्हा लखपती; गुंतवणूकदारांना SIP करेल मालामाल

किती फंड जमा होईल -

स्टेप-अप एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये १५ वर्षांमध्ये गुंतवणूक केली तर जवळपास एक कोटी रुपयांचा फंड होऊ शकतो.

एकूण जमा रक्कम - ३८,१२,६९८

व्याज - ६३,९७,५९९

एकूण फंड - १,०२,१०,१९७

(नोट- ही माहिती स्टेप अप एसआयपीद्वारे म्युच्युअलमध्ये गुंतवणुकीच्या आधारावर आहे.)

Retirement Plans
Crorepati Formula : फक्त ५,००० रुपये जमा करा आणि करोडपती व्हा; SIP ची मालामाल करणारी स्किम

महिन्याला ५० हजार रक्कम कशी मिळणार ?

१५ वर्षानंतर एकूण रक्कम काढा, त्याची अर्धी रक्कम म्हणजे ५० लाख रुपयांची गुंतवणूक करा अथवा त्यावेळची गरज भागवा, जसे की घर घेण्यासाठी अथवा इतर कोणत्या कारणासाठी.. उरलेले ५० लाख पुन्हा एकदा एसआयपीद्वारे म्युच्युअल फंडमध्ये टाका. आता तुम्हाला प्रत्येक महिन्याला पैसे गुंतवायचे नाहीत, तर एकत्र टाका.

समजा, त्यावर वर्षाला १२ टक्के व्याज मिळाले. व्याज जास्तही असू शकते. ५० लाख रुपयांवरील व्याजावर तुम्हाला वर्षाला ६ लाख रुपये मिळतील. म्हणजेच, तुम्हाला महिन्याला ५० हजार रुपये मिळतील. आशा स्थितीमध्ये तुमची ५० लाख रुपयांची रक्कम तशीच राहील अन् महिन्याला ५० हजार रुपयेही मिळतील.

नोट - वरील बातमीमध्ये सांगितलेली माहिती फक्त वैयक्तिक विश्लेषक किंवा ब्रोकिंग कंपन्यांच्या आहेत. आमचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. गुंतवणुकदारांनी कोणताही गुंतवणूक निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा..

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com