Crorepati Formula : फक्त ५,००० रुपये जमा करा आणि करोडपती व्हा; SIP ची मालामाल करणारी स्किम

SIP Investment Tips : गुंतवणूक वाढल्यानंतर त्यावरील व्याजदर देखील वाढत जाईल. एसआयपीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही गुंतवणूक केल्यावर २० वर्षांनी १ कोटी रुपयांपर्यंत परतावा मिळण्यास मदत होईल.
SIP Investment Tips
Crorepati FormulaSaam TV
Published On

करोडपती होण्याचं स्वप्न प्रत्येक व्यक्ती पाहत असतो. अगदी गरीब, गरजू व्यक्तींपासून ते मध्यमवर्गीय आणि श्रीमंत व्यक्ती देखील करोडपती व्हायचं स्वप्न पाहतात. लॉट्री वगैरे या सर्व नशिबाच्या गोष्टी आहेत. मात्र तुम्ही या व्यतिरिक्त म्युचअल फंड किंवा एसआयपी सारख्या योजनांमध्ये पैसे गुंतवून देखील करोडपती होऊ शकता. कसं ते या बातमीतून जाणून घेऊ.

SIP Investment Tips
Mumbai Goa Highway Traffic Jam: जाणवली ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुक राेखली, वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

करोडपतीचा फॉर्म्यूला

करोडपती होण्यासाठी तुम्हाला दिवसा फक्त १८० रुपयांची बचत करावी लागेल. महिन्याला ५,४०० रुपयांची गुंतवणूक करून तुम्ही करोडपतीच्या घरात जाल. त्यासाठी बचत केलेले पैसे एसआयपीमध्ये गुंतवायचे. त्यानुसार वर्षाला तुमचे ६४,८०० रुपये आणि २० वर्षात १२,९६,००० रुपये जमा होतील. या स्किममध्ये तुम्हाला १२ टक्के व्याज मिळेल. या व्याजदरानुसार तुम्हाला मॅच्युरीटीवर तब्बल ५३,९५,३९९ रुपये परत मिळतील.

दरवर्षी गुंतवणूकीत १० टक्क्यांची वाढ

गुंतवणूकीत तुम्हाला दरवर्षी १० टक्क्यांची वाढ करावी लागेल. २० वर्षांसाठी गुंतवणूक करताना तिसऱ्या वर्षी ६,५३४ आणि त्याच्या पुढच्या वर्षी ७,१८७ रुपये तुम्हाला दरमहा जमा करावे लागतील. तुमची गुंतवणूक वाढल्यानंतर त्यावरील व्याजदर देखील वाढत जाईल. एसआयपीमध्ये अशा पद्धतीने तुम्ही गुंतवणूक केल्यावर २० वर्षांनी १ कोटी रुपयांपर्यंत परतावा मिळण्यास मदत होईल.

२० वर्षांची गुंतवणूक फार मोठी असते. या मोठ्या कालावधीत तुमच्या मुलांचे शिक्षण देखील पूर्ण झालेले असते. त्यामुळे तुम्ही मुलांच्या लग्नासाठी ही गुंतवणूक करू शकता किंवा घर खरेदीसाठी देखील देखील या पर्यायामध्ये देखील गुंतवणूक करू शकता.

मुंबईसारख्या ठिकाणी घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे तुम्ही घराचं प्लानिंग करत असाल तर एसआयपीच्या या स्किममध्ये गुंतवणूक करू शकता.

SIP Investment Tips
Mumbai Thackeray Group : ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात!

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com